Water Sources Agrowon
ॲग्रो विशेष

Natural Water Sources : चांदोलीत नैसर्गिक पाणवठ्याची स्वच्छता

Chandoli National Park : चांदोली राष्ट्रीय उद्यानात चांगला पाणीसाठा असणाऱ्या नैसर्गिक पाणवठ्याची स्वच्छता करण्यात आली.

Team Agrowon

Sangli News : सर्वत्र कडक उन्हाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. या पाणी टंचाईच्या झळा मनुष्यप्राण्यांप्रमाणे पाळीव व वन्य प्राण्यांना जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे वन्य प्राण्याचे पाण्याविना हाल होऊ नयेत, याकरिता चांदोली राष्ट्रीय उद्यानात चांगला पाणीसाठा असणाऱ्या नैसर्गिक पाणवठ्याची स्वच्छता करण्यात आली. कृत्रिम पाणवठ्यावर टँकरने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

१५ ऑक्टोबरपासून चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकासाठी सुरू झाले आहे. दिवाळी सुटीत अनेक पर्यटकांनी चांदोली धरण, अभयारण्य, गुढे पाचगणी पवनचक्की, पठार पाहण्यासाठी पसंती आहे. त्यानंतर शालेय सहली सुरू झाल्याने शालेय विद्यार्थ्यांसह चार हजारांवर पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटला. गत वर्षी मेमध्ये झालेल्या वन्यजीव गणनेत बिबट्यासह १५ वन्यप्रजातीचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले होते.

त्यामध्ये बिबट्या, गवा, सांबर, रानडुक्कर, ससा, पिसोरा, भेकर, अस्वल, वानर, सायाळ, मुंगुस, मोर, रानकोंबडी, शेकरू, उदमांजर यांचा समावेश आहे. रात्री पाणवठ्यावर ३०८ प्राणी पाणी पिण्यासाठी आल्याची नोंद झाली आहे. चांदोलीचे जंगल घनदाट असल्याने येथे प्राण्यांना उन्हाच्या झळा जास्त बसत नसल्या तरी पाण्याची नितांत गरज आहे.

जंगलात ओढ्या-नाल्याच्या माध्यमातून असंख्य नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्या ठिकाणी पाण्याचा स्रोत जात आहे, अशा ठिकाणी प्राण्यांना व्यवस्थित पाणी पिता यावे, याकरिता त्या ठिकाणी पालापाचोळा बाजूला करून पाणवठ्याची स्वच्छता करण्यात आली.

चांदोली राष्ट्रीय उद्यानात चांगला पाणीसाठा असणाऱ्या नैसर्गिक पाणवठ्याची स्वच्छता करण्यात आली आहे. कृत्रिम पाणवठ्यावर टँकरने पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांना पुरेसे पाणी या कडक उन्हाळ्यातही उपलब्ध होत आहे.
काशिलिंग बादरे, वनपाल, मणदूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT