Tur and Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Complaints : कापूस, तूर नुकसानीच्या तक्रारी विमा कंपनीने स्वीकाराव्यात

Unseasonal Rain : परभणी जिल्ह्यात २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे किन्होळा (ता. परभणी) येथील शेतकऱ्यांच्या कापूस व तूर पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यात २७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे किन्होळा (ता. परभणी) येथील शेतकऱ्यांच्या कापूस व तूर पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.

त्यामुळे काढणी पश्चात नुकसान (पोस्ट हार्वेस्टिंग) या जोखीम बाबीअंतर्गत पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या तक्रारी विमा कंपनीने स्वीकाराव्यात. संबंधित शेतकऱ्यांना विमा परतावा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास बाबर यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे केली आहे.

नोव्हेंबर महिन्यातील मॉन्सूनोत्तर पावसामुळे कापूस व तूर पिकांचे नुकसान झालेल्या किन्होळा (ता. परभणी) येथील शेतकऱ्यांनी ऑनलाइन वैयक्तिक तक्रारीद्वारे पीकनुकसानीची माहिती पीकविमा कंपनीला कळविली.

वेचणीच्या वेळी झालेले नुकसान ही बाब काढणी पश्चात नुकृसान (पोस्ट हार्वेस्टिंग) या जोखीम बाबी अंतर्गत येते. परंतु गावातील ९० शेतकऱ्यांच्या तक्रारी विमा कंपनीने नाकारल्या आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारी स्वीकाराव्यात.

पंचनामे करावेत, अन्यथा शेतकऱ्यांना उपोषणास परवानगी द्यावी, अशी मागणी विलास बाबर, उद्धव खरवडे, प्रभाकर खरवडे, रावसाहेब जटाळ, भगवान खरवडे, द्वारकादास खरवडे यांनी जिल्हाप्रशासनाकडे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT