Crop Damage Compensation : दीड महिना झाला, केव्हा मिळणार नुकसान भरपाई?

Unseasonal Rain : आता झालेल्‍या अवकाळी पाऊस व गारपिटीनेही पिकांचे नुकसान केले आहे. मागील नुकसानाचीच मदत मिळाली नसल्याने ही केव्हा मिळेल, असा सवाल उपस्थित होत आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीसाठी मुख्यमंत्र्यांनी वाढीव दराने मदत देण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात नागपुरात सरकारने केली होती. आज दीड महिना होत असताना अद्याप मदत मिळालेली नाही. त्यातच आता झालेल्‍या अवकाळी पाऊस व गारपिटीनेही पिकांचे नुकसान केले आहे. मागील नुकसानाचीच मदत मिळाली नसल्याने ही केव्हा मिळेल, असा सवाल उपस्थित होत आहे.

वर्ष २०२३ च्या वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी व पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन पिकाचे सर्वाधिक मोठे नुकसान झाले. पीक विमा मंजूर करण्यात आला. दिवाळीपूर्वी विम्याची २५ टक्के अग्रिम देण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु रक्कम मिळाली नाही. त्यानंतर कापसावर लाल्या रोग आला.

Crop Damage
Crop Damage Compensation : यवतमाळ जिल्ह्यातील तीस हजार शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षा

त्यामुळे हातात आलेले पीक गेले. त्यानंतर अवकाळी पावसाचा पिकांना फटका बसला. हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत देण्याचे जाहीर केले होते. केंद्र सरकारपेक्षा वाढीव दराने मदत देण्याची घोषणा हिवाळी अधिवेशनात केली.

मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या मदतीचा शासन आदेश काढण्यासाठी २० दिवस लागले. त्यानुसार तालुकास्तरावरून नुकसानीबाबतचे सुधारित प्रस्ताव मागवण्यात आले. विभागीय आयुक्तांनी तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हे प्रस्ताव पाठवून आज पंधरा दिवस आहे. परंतु अद्याप नुकसान भरपाईची मदत आली नाही.

शनिवारी (ता.१०) अवकाळी पाऊस व गारपीट झाली. यामुळे पिकांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते. एकीकडे नुकसान होत असताना दुसरीकडे मालाला भाव नाही. शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. ती केव्हा मिळेल, असाच प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना ‘अवकाळी’च्या अनुदानाची प्रतीक्षा

...अशी मिळणार मदत

जिरायत १३,६०० रुपये

बागायत २७,००० रुपये

बहुवार्षिक ३६,००० रुपये

शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला मदतीची गरज आहे. सरकार मदत करण्यापेक्षा फक्त घोषणा करीत आहे. हिवाळी अधिवेशनात केलेल्या घोषणेवर अद्याप अंमल झालेला नाही. आता अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झाले आहे. सरकारला खरच शेतकऱ्यांची काळजी असेल तर दोन दिवसांत मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली पाहिजे.
कुंदा राऊत, उपाध्यक्षा, जि.प.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com