Central Institute of Citrus Research Agrowon
ॲग्रो विशेष

Citrus Crops : लिंबूवर्गीय पिकांचे व्हावे मूल्यवर्धन

Director of Citrus Research Institute Dr. Dilip Ghosh : ‘‘भारतीय लिंबूवर्गीय पिकांची उत्पादकता वाढ तसेच त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल."

Team Agrowon

Nagpur News : ‘‘भारतीय लिंबूवर्गीय पिकांची उत्पादकता वाढ तसेच त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याची गरज आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. त्यासाठी या क्षेत्रात कार्यरत सर्वांनी सामूहिक प्रयत्नाअंतर्गत पुढे येण्याची गरज आहे,’’ असे मत केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे संचालक डॉ. दिलीप घोष यांनी व्यक्‍त केले.

सीसीआर (सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सिट्रस रिसर्च) च्या वतीने संस्था तसेच प्रक्रिया उद्योजक यांच्यात समन्वय निर्माण होण्यासाठी ‘ॲग्रो इंडस्ट्री मिट’चे आयोजन करण्यात आले. भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक प्रा. एस. एल. मेहता, मणिपूर सरकारमधील फलोत्पादन संचालक के. देबदत्ता शर्मा, ममता जैन यांच्यासह लिंबूवर्गीय शेतीमाल प्रक्रिया उद्योग क्षेत्रातील ३५ उद्योजक उपस्थित होते.

प्रा. मेहता म्हणाले, ‘‘कीडरोगांचा प्रादुर्भाव कमी आणि झाडांपासून अधिक काळ फळांची उपलब्धता व्हावी, याकरिता रोपांची गुणवत्ता महत्त्वाची ठरते. रोगग्रस्त रोपांची लागवड झाल्यास त्यातून अपेक्षित उत्पादकता मिळत नाही व शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते.

त्याची दखल घेत रोप निर्मितीसाठी खास तंत्रज्ञान ‘सीसीआरआय’ने विकसित केले आहे. संस्थेच्या मर्यादा असल्याने हे तंत्रज्ञान सशुल्क पद्धतीने देशभरातील रोपवाटिकाधारकांना त्यांच्या मागणीनुसार देण्यात येत आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा प्रसार होऊन रोगमुक्‍त कलमांची उपलब्धता शेतकऱ्यांना होईल.’’

तांत्रिक सत्रात वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. रॉय यांनी आयोजनामागील भूमिका विशद केली. त्यानंतर जैन इरिगेशन सिस्टीम लि., सह्याद्री फार्म, नाशिक आणि सुमितोमो केमिकल यांच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले. १३ उद्योग प्रतिनिधींनी पॅनेल सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली. दुसऱ्या दिवसाच्या सत्रात व्यवसाय ते ग्राहक संमेलन झाले. या वेळी आदिवासी अपर आयुक्‍त रवींद्र ठाकरे यांची उपस्थिती होती.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी

‘ॲग्रो इंडस्ट्री मिट’मध्ये ‘सीसीआरआय’ने महाधन ॲग्रिटेक लिमिटेड, पुणे व फलोत्पादन तसेच मृदा संवर्धन विभाग, मणिपूर सरकार यांच्याशी सामंजस्य करार झाला. या वेळी या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT