Citrus Processing Plant : पहिल्या संत्रा प्रक्रिया उद्योगाचे रविवारी उद्‍घाटन

Fruit processing Plant launch : अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने सातपुड्याच्या पायथ्याशी संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड शिवारात या प्रकल्पाची सुरुवात होत आहे.
Industry launch
Industry launchAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील संत्रा उत्पादकांसाठी महत्त्वाचा असलेला पहिला प्रक्रिया उद्योग रविवारी (ता.१०) कार्यान्वित होत आहे. अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजच्या पुढाकाराने सातपुड्याच्या पायथ्याशी संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड शिवारात या प्रकल्पाची सुरुवात होत आहे.

या माध्यमातून संत्रा उत्पादकांना लाभ होणार असून, स्थानिक युवकांना रोजगार मिळणार आहे. अभिता ॲग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक सुनील शेळके, दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचत गट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्ष जयश्री शेळके यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हा उपक्रम सुरू केला.

Industry launch
Citrus Estate : ‘सिट्रस इस्टेट’चे काम पुढे सरकता सरकेना

संग्रामपूर तालुक्यात सोनाळा परिसर संत्र्याचा बेल्ट म्हणून ओळखला जातो. या भागात संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाची गरज होती. नेमक्या याच बाबीचा विचार करून सोनाळा येथे बोरखेड मार्गावर हा संत्रा प्रक्रिया उद्योग उभारला आहे. या संत्रा प्रक्रिया केंद्रात शेतकऱ्यांच्या मालाची क्लिनिंग, वॅक्सिंग, ग्रेडिंग करून मिळणार आहे.

Industry launch
Citrus Estate : विदर्भातील तीन सिट्रस इस्टेटसाठी ७ कोटींचा निधी मंजूर

अत्याधुनिक मशिनरीद्वारे प्रक्रिया संत्रा प्रक्रिया उद्योगासाठी बंगळूरवरून अत्याधुनिक मशिन आणण्यात आली आहे. कमी वेळात दर्जेदार प्रक्रिया करण्याची या मशिनची क्षमता आहे. संगणकाद्वारे मशिनचे काम चालते. जम्मू-काश्मीर, पंजाबमधील फळप्रक्रिया उद्योगांत अशा प्रकारच्या अत्याधुनिक मशिनचा वापर केला जातो. वॅक्सिंगचा माल बांगलादेश बॉर्डर, दिल्ली, जम्मू- काश्मीर भागांत अधिक प्रमाणात चालतो.

सोनाळा येथे संत्रा प्रक्रिया उद्योगासह पुढील टप्प्यात संत्रा ज्यूस आणि इतर पूरक उद्योगसुद्धा सुरू करण्यात येतील. भविष्यात नामांकित कंपन्यांसोबत ‘अभिता’चा करार होऊन शेतकऱ्यांना चांगल्या बाजारपेठा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
सुनील शेळके, संस्थापक, अभिता ॲग्रो इंडस्ट्रीज

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com