Chili Agrowon
ॲग्रो विशेष

Chili Seed : अबब... मिरची बियाणे आठ हजार रुपये किलो?

Kharif Season : पावसाळ्याला अवघा एक महिना उरला असताना शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग वाढली आहे.

Team Agrowon

Amaravati News : पावसाळ्याला अवघा एक महिना उरला असताना शेतकऱ्यांची खरीप हंगामाची लगबग वाढली आहे. त्याचाच फायदा घेत मिरचीचे १० ग्रॅम बियाण्यांचे पाकिट ५५० ते ८०० रुपयांपर्यंत विनाबिल बाजारात विकले जात आहे. यावर शासकीय यंत्रणेचा कोणताही अंकुश नसल्याने या प्रकारात शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खरीप हंगामाला काही दिवस शिल्लक आहेत. दरवर्षी रोहिणी नक्षत्राला २५ जूनला सुरुवात होते. त्यातही शेतकऱ्यांना मिरची बियाण्याची पेरणी एक महिन्या अगोदर करून जुलै महिन्यापर्यंत रोपे तयार करावी लागतात. त्यासाठी शेतकऱ्यांना आताच जमीन तयार करून वाफे तयार करावे लागतात.

वाफ्यात शेणाच्या गवऱ्या जाळून खत तयार करून त्यात पाणी सोडावे लागते. मग मिरची बियाण्याची पेरणी करावी लागते. त्यानंतर शेतकऱ्याला दररोज पाणी घालून लागवडीयोग्य रोपे तयार करावी लागतात. एवढी मेहनत करून उत्पादित हिरव्या मिरचीला दोन ते पाच हजार रुपये प्रति १०० किलोला दर मिळतो.

म्हणजे आजची १० ग्रॅम बियाण्याची किंमत शेतकऱ्यांना १०० किलो हिरवी मिरची विकल्यावरही मिळत नाही. मात्र कधीतरी चांगला भाव मिळेल आणि भरपाई होईल, या आशेवर शेतकरी दरवर्षी मिरची लागवडीत सातत्य ठेवत आहेत.

सध्या बाजारात मिरची बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी जात आहेत; पण कृषी केंद्रात बियाण्याचे भाव गगनाला भिडले आहेत. शेतकरी कर्ज काढून तसेच घरातील सोने गहाण ठेवून महागडे बियाणे मजबुरीने खरेदी करीत आहेत.
- गणेश खडके, शेतकरी, रा. टेम्ब्रुसोंडा, जि. अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT