Red Chili Rate : नगरला लाल मिरचीला १८ हजार रुपयांपर्यंत दर

Chili Rate : नगर येथील कृषी उत्पन्ना बाजार समितीत नगर, सोलापूर, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक भागातून लाल मिरचीची आवक होत असते.
Sillod Chili
Sillod ChiliAgrowon

Nagar News : दरवर्षीच्या तुलनेत यंदा लाल मिरचीची आवक कमी आहे. नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत दररोज दोनशे क्विंटलपर्यंत लाल मिरचीची आवक होत असून किमान ४६०० ते कमाल १८६०० रुपयांपर्यंत आणि सरासरी ११६०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मिरचीच्या दरात सातत्याने चढउतारही होत आहे.

नगर येथील कृषी उत्पन्ना बाजार समितीत नगर, सोलापूर, मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र, कर्नाटक भागातून लाल मिरचीची आवक होत असते. बाजार समितीत लाल मिरचीच्या खरेदी-विक्रीतून मोठ्या प्रमाणात आवक होत असते. प्रामुख्याने मागणी असलेल्या लवंगी, बेडगी मिरचीला अधिक मागणी असते.

Sillod Chili
Red Chili Market : लाल मिरचीच्या दरात घसरण

उन्हाळ्यात मसाले तयार करण्यासाठी मागणी अधिक असल्याने बाजारात लाल मिरचीची आवकही बऱ्यापैकी होत असते. यंदा मात्र आवक कमी असल्याचे दिसून येत आहे. सध्या दररोज दोनशे क्विंटलपर्यंत आवक होत आहे. शनिवारी (ता. ३०) १५९ क्विंटलपर्यंत आवक होऊन किमान ४६०० ते कमाल १८६०० रुपयांपर्यंत आणि सरासरी ११६०० रुपयांपर्यंत दर मिळाला असला तरी दरात सतत चढउतार होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांचा विचार केला तर गुरुवारी (ता. २८) १७२ क्विंटलची आवक होऊन किमान ६७९० ते कमाल २५७०० रुपये व सरासरी १५२४६ रुपयांपर्यंत दर मिळाला. मंगळवारी (ता. २६) ११५ क्विंटलपर्यंत आवक होऊन किमान ७८०० ते कमाल २१३०० व सरासरी १४४५० रुपयांचा दर मिळाला.

Sillod Chili
Red Chili Market : लाल मिरची बाजारात यंदा मोठी उलाढाल

शनिवारी (ता. २३) ११२ क्विंटलपर्यंत आवक होऊन किमान ६२६२ ते कमाल १९४०० व सरासरी १२ हजार ८३१ रुपयांचा दर मिळाला. गुरुवारी (ता. २१) १०१ क्विंटलपर्यंत आवक होऊन किमान ७८०० ते कमाल १९४०० व सरासरी १३६०० रुपयांचा सरासरी दर मिळाला.

रविवारी (ता. १७) १३५ क्विंटलची आवक होऊन किमान ६७०० ते कमाल २१३०० व सरासरी १४ हजार रुपयांचा दर मिळाला. मिरचीच्या आवकेत आणि दरात सातत्याने चढउतार होत आहे. यंदा नगरच्या बाजारात दरवर्षीच्या तुलनेत मिरचीची आवक कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com