Chili Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Chili Cultivation : मिरचीने शेतकऱ्यांच्या संसारात गोडवा

Chili Farming : वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून पालघर जिल्ह्यात ओळख प्राप्त आहे. वाड्याचा तांदूळ ‘वाडा कोलम’ या नावाने प्रसिद्ध आहे. असे असले तरी भातशेती हा व्यवसाय पूर्णत: निसर्गअधीन आहे.

Team Agrowon

Palghar News : तालुक्यातील कोंढले येथील शेतकऱ्यांनी मिरचीची लागवड केली आहे. या तिखट मिरचीने शेतकऱ्यांच्या संसारात गोडवा आणला असून, एकरी एक ते दीड लाख रुपये निव्वळ नफा ते मिळवत आहेत.

वाडा तालुक्याला भाताचे कोठार म्हणून पालघर जिल्ह्यात ओळख प्राप्त आहे. वाड्याचा तांदूळ ‘वाडा कोलम’ या नावाने प्रसिद्ध आहे. असे असले तरी भातशेती हा व्यवसाय पूर्णत: निसर्गअधीन आहे.

तसेच मजुरांचा तुटवडा, खते, बी-बियाणे, औषधे यांची वाढती महागाई आदी बाबींमुळे भातशेतीचा व्यवसाय तोट्यातच असून, न परवडणारा आहे.

त्यामुळे बहुतांशी शेतकरी हे पावसाळ्यातील भातपीक घेतल्यानंतर आपल्या जमिनीत मुबलक पाण्याच्या ठिकाणी विविध प्रकारचा भाजीपाला लागवड करतात. यातून त्यांना खर्च वगळून ठोस उत्पन्न मिळते.

तालुक्यातील कोंढले येथील संजय बाळकृष्ण बागूल या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर जागेत १२ हजार मिरचीचे रोप लावले आहे. यासाठी किमान ८० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.

मिरची काढणीसाठी तयार झाली असून, आठ दिवसाआड मिरचीचा तोडा केला जातो. ही मिरची भिवंडी येथे बाजारात विक्रीसाठी नेली जात असून, प्रतिकिलो ६० ते ६५ रुपये भाव मिळतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT