Chili Farming : डहाणूतील शेतकऱ्यांचा मिरची शेतीकडे वाढता कल

Chili Cultivation : डहाणू तालुक्यातील सुमारे ४० ते ४५ गावांमध्ये तब्बल साडेसहा हजार एकर जमिनीवर मिरची, भोपळी मिरची आणि आरची मिरचीची लागवड केली जाते.
Chili Farming
Chili CultivationAgrowon
Published on
Updated on

Palghar News : डहाणू तालुक्यातील सुमारे ४० ते ४५ गावांमध्ये तब्बल साडेसहा हजार एकर जमिनीवर मिरची, भोपळी मिरची आणि आरची मिरचीची लागवड केली जाते. येथील मिरचीला मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, तसेच गुजरातमधील अहमदाबाद, सूरत, वापी यांसारख्या मोठ्या बाजारपेठांत मागणी आहे.

बावडा, कैतखाडी, चंद्रनगर, कोटिम, आसनगाव, साखरे, सारणी, वाघाडी, वांगर्जे यासारख्या ४० ते ४५ गावांमधील साडेसहा ते सात हजार एकर जमिनीवर मिरचीचे उत्पादन घेतले जाते. ‘सूर्या’तील कालव्याचे पाणी, नदीचे, तसेच विहिरी व बोअरवेलच्या पाण्याचा वापर करून भाजीपाला उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणावर शेती ओलिताखाली आणली गेली.

Chili Farming
Chili Crop Damage : नंदुरबारात मिरचीला नैसर्गिक आपत्तीचा फटका

डहाणू तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिक भातशेती करता करता भाजीपाला, फूलशेती, तसेच आधुनिक स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट उत्पादनाकडे वळल्याने आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आहे.

या भागातील पावसाळ्यानंतर मोलमजुरीसाठी स्थलांतर करणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबांना मिरची लागवड हा आर्थिक उभारीसाठी प्रभावी पर्याय ठरला आहे. दररोज सुमारे २०० ते २५० टन मिरची बाजारपेठांमध्ये पाठवली जाते.

Chili Farming
Chili Cultivation : खारपाण पट्ट्यात मिरची लागवडीचा प्रयोग

सध्या मिरचीला ६० ते ६५ रुपये प्रतिकिलो भाव आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा येत आहे. त्यात आधुनिक तंत्रज्ञानात शेडनेट आणि स्प्रिंकलरचा वापर केल्याने भाजीपाला उत्पादन वाढत आहे. तिखट मिरचीबरोबरच विविधरंगी ढोबळी मिरचीचे उत्पादनदेखील घेतले जात आहे. यासाठी अनेक शेतकरी कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठाचेही मार्गदर्शन घेत आहेत.

मी पूर्वी फक्त भातशेती करत होतो. भातशेती फक्त एकदाच होते. विविध भाजीपाला, झेंडूच्या फुलापासून भातापेक्षा चांगले उत्पादन मिळते. यावर्षी १४ एकरवर मिरचीची लागवड केली आहे. दररोज १०० ते १२० किलो मिरची तोडली जाते. आता उत्पादन निघू लागले आहे. सध्या भाव चांगले आहेत. त्यात मिरची उत्पादनातून चांगला फायदा होत आहे.
- रघुनाथ सुतार, मिरची उत्पादक, सारणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com