Sugarcane Juice  agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Juice : आला पाहुणा; सुरू झाला रसघाणा ; नवा पायंडा; जांभळीत थंड उसाच्या रसाने होतोय पाहुणचार

Sugarcane : घरी येणाऱ्या पाहुण्यांना ताजा आणि उसाचा थंड रस देऊन पाहुणचार करण्याचा नवा पायंडा जांभळी (ता. शिरोळ) येथे पडला आहे. जांभळी या छोट्या गावात बाराहून अधिक उसाचा रस काढण्याचे हातघाणे बसविण्यात आले आहेत.

Team Agrowon

Kolhapur News : जयसिंगपूर, जि. कोल्हापूर : घरी येणाऱ्या पाहुण्यांना ताजा आणि उसाचा थंड रस देऊन पाहुणचार करण्याचा नवा पायंडा जांभळी (ता. शिरोळ) येथे पडला आहे. जांभळी या छोट्या गावात बाराहून अधिक उसाचा रस काढण्याचे हातघाणे बसविण्यात आले आहेत. वाढत्या उन्हाने हैराण होणाऱ्या पाहुण्यांनाही हा पाहुणचार चांगलाच भावत असून ‘आला पाहुणा की सुरू कर उसाचा घाणा’ असे चित्र पाहायला मिळत आहे.

जांभळी शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवर वसलेले गाव. अलीकडच्या काळात गावात पाहुणचाराची वेगळी प्रथा सुरू झाली आहे. घरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार चहाऐवजी उसाचा ताजा आणि थंड रस देऊन केला जाऊ लागला आहे. गावात दहा ते बारा ठिकाणी हातघाणे बसविण्यात आले आहेत.

घरात पाहुणे आले अथवा उसाचा रस घ्यायची इच्छा झाली तर शेतात जाऊन दोन ऊस तोडून हातघाण्यावर रस काढला जातो. ८६०३२, ६७१ ८६ या जातीच्या उसातील गोडवा पाहुण्यांना चाखण्याची संधी मिळत आहे. ठिकठिकाणी हातघाण्याबरोबरच रस काढून देणाऱ्या रसवंती गृहातदेखील रस काढून घेण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी होत आहे. वाढत्या उन्हामुळे दिवसेंदिवस
उसाच्या रसाला चांगली मागणी होऊ लागली आहे.

अलीकडे एक-दोन वर्षांत गावात ही प्रथा रूढ होत आहे. दरवर्षी हातघाण्यांची संख्या वाढू लागली आहे. गावातील मळा भागात खास करून हातघाण्याची संख्या अधिक आहे. ऊस तोड हंगामाच्या काळात व त्याआधी दिवाळीपासूनच रस काढला जातो. एका उसापासून सर्वसाधारणपणे एक लिटर रस निघतो.

चार पाहुण्यांना पुरेल इतका रस एका उसापासून मिळतो. उसाचा ताजा रस आरोग्यवर्धक आहे. तसेच चहाऐवजी उसाचा रस घरोघरी दिला जात असल्याने जांभळीतील पाहुण्यांना मात्र उसाचा रस चाखायला मिळत आहे.

घरी येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आम्ही उसाचा ताजा थंड रस देऊन करतो. ऊस हंगामाच्या काळात पाच ते सहा महिने रस उपलब्ध होतो. दिवाळीनंतर पुन्हा हातघाणे सुरू होतात. वाढत्या उन्हामुळे पै-पाहुण्यांबरोबरच कुटुंबीयांना उसाचा रस गारवा देणारा ठरत आहे.
- राजाराम तासगावे, शेतकरी, जांभळी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT