MPSC Success Story Agrowon
ॲग्रो विशेष

MPSC Success Story : शेतकऱ्यांच्या लेकरांनी ‘एमपीएससी’तून घडवली किमया

MPSC Result 2024 : विदर्भातील शिक्षणाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील तीन विद्यार्थ्यांची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे.

Team Agrowon

Chandrapur News : विदर्भातील शिक्षणाची पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील तीन विद्यार्थ्यांची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. घरची आर्थिक स्थिती चांगली नसताना कष्टात सातत्य ठेवत या तिघांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमीमध्ये क्लास लावूनच अधिकारी बनता येते, या गैरसमजुतीला फाटा देत ब्रह्मपुरी तालुक्यातील कन्हाळगाव या हजार लोकसंख्या असलेल्या गावातील दीपाली काकाजी मिसार या शेतकरी कन्येने महाविद्यालयाच्या व खासगी अभ्यासिकेत अभ्यास करून हे यश मिळवले आहे. दीपाली ही शेतकरी कुटुंबातील असून तिचे वडील काकाजी मिसार यांच्याकडे ४ एकर शेती आहे.

आपली मुलगी शिकून मोठी व्हावी म्हणून शेतात त्यांनी आपल्या पत्नीसह अपार कष्ट केले. दीपालीचे ४ थी पर्यंत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण झाले. त्यानंतर गावापासून ८ किमी अंतरावर असलेल्या ब्रह्मपुरी शहरातील नेवजाबाई हितकारिणी विद्यालयात तिने इयत्ता ५ वीसाठी प्रवेश घेतला.

सायकलने गावावरून प्रवास करीत तिने एमएससी पर्यंतचे शिक्षण घेतले. या बळावर तिने यश गाठले. ती एमपीएससीमधून २६व्या वर्षी पीएसआय बनली. मागील वर्षात तिने तलाठी परीक्षेतही यश मिळवले होते. सध्या ती चिमूर तालुक्यातील कोलारा गेट येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे‌.

ब्रह्मपुरी तालुक्याच्या टोकावर जंगलव्याप्त भागात वसलेल्या बल्लारपूर या छोट्याशा गावातील डिसेंबर राजिराम दिवटे याची देखील एमपीएससीतून पीएसआयपदी निवड झाली आहे. डिसेंबर शेतकरी कुटुंबातील असून ४ थी पर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर ५ वी ते १० वी मुडझा येथील हायस्कूलमध्ये तिने शिक्षण घेतले.

त्यानंतर ११ वी, १२ वी गडचिरोली येथे झाल्यानंतर पदवीचे शिक्षण त्याने ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात घेतले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे गाठले. तिथेच अभ्यास करून परीक्षा दिल्या, मात्र सुरुवातीला यश मिळाले नाही. तरीदेखील खचून न जाता तिसऱ्या प्रयत्नात त्याने पीएसआय परीक्षेत मजल मारली.

ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील ‌नामदेव जांभूळकर यांना चार मुले दोघेही पती-पत्नी कमी शिकलेले आणि अर्धा एकर शेती. त्यामुळे मजुरी करून कसेबसे जीवन जगणे सुरू होते. मुलींना शिक्षणाची आवड होती. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने गायत्रीने इंजिनिअरिंगचे शिक्षण अर्धवट सोडले.

पुण्यातील एका कंपनीत ती नोकरी करू लागली. मात्र शिक्षणाची आवड असल्याने कामासोबतच पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर कमवा व शिका योजनेतून पदव्युत्तर शिक्षणही केले. कुठलेही क्लासेस न लावता मेहनतीवर स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. आणि अखेर ती एमपीएससीमधून पीएसआय झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT