Eknath shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Tembhu Irrigation Project : टेंभूच्या विस्तारीत योजनेस मुख्यमंत्र्याची मंजूरी ; सांगलीत सुमन पाटील आणि रोहित पाटलांचं आजपासून उपोषण

Sangli News : टेंभू उपसा सिंचनच्या विस्तारित योजनेमध्ये तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या आमदार सुमन आर आर पाटील आजपासून बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू विस्तारीत योजनेसाठी ८ टी.एम.सी. पाणी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil Shinde

Tasgaon Water issue : टेंभू सिंचन योजनेत सांगली जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १७ गावांचा समावेश करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीच्या आमदार सुमन आर आर पाटील आणि रोहित पाटील आजपासून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. दरम्यान,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय केला.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा (Satara), सांगली (Sangli) आणि सोलापूर (Solapur) या तीन जिल्ह्यातील दुष्काळी ७ तालुक्यातील २१० गावांचा सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी टेंभू योजनेची सुरुवात केली. या योजनेचे पाणी तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील १७ गावांना मिळावे, या मागणासाठी आमदार सुमन पाटील (Suman Patil) सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आजपासून त्यांचे उपोषण सुरू होणार आहे.

दरम्यान, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. या विस्तारीत योजनेसाठी ८ टी.एम.सी. पाणी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्यामुळे खानापूर,आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील ३४ गावांना त्याचा लाभ होणार आहे. याच शासन निर्णयाची प्रत मुख्यमंत्री शिंदे यांनी आटपाडी खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी उपोषण सुरू ठेवणार असल्याची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये लवादाची बैठक यशस्वी झाली होती. त्यानंतर या भागासाठी वाढीव पाणी मंजूर करुन घेतलं आणि त्याबाबतचा प्रस्ताव तयार असतानाही त्याला का वेळ लागतोय, हा सवाल आम्ही शासनाला विचारणार आहे. तसेच योजनेला मंजूरी देऊन दुष्काळग्रस्तांच्या तोंडा पाने पुसण्याचे काम सुरू आहे. योजनेच्या काम कधी चालू करणार आहे. हे लेखी स्वरुपात आम्हाला द्यावे, अशी मागणी रोहित पाटील यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT