Tembhu Water Scheme : टेंभू योजनेवरून सांगलीचे आमदार -खासदार आमने -सामने, आबांच्या घरावर काकांचा प्रहार

Sangli Tembhu Water Scheme : सांगली जिल्ह्यातील सावळजसह परिसरातील आठ गावे ही अनेक वर्षांपासून टेंभूच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
Tembhu Water Scheme
Tembhu Water Schemeagrowon
Published on
Updated on

MP Sanjay Patil vs MLA Sumantai Patil : सांगली जिल्ह्यातील सावळजसह परिसरातील आठ गावे ही अनेक वर्षांपासून टेंभूच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. टेंभू योजनेच्या अहवालास तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देऊन या आठ गावांचा योजनेमध्ये समावेश व्हावा, यासाठी गांधी जयंतीपासून (दि. २) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आमदार सुमनताई पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला. यावरून आता राजकारण तापले आहे. सांगलीचे भाजप खासदार संजय पाटी यांनी सुमनताई पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

यावर भाजप खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आमदार सुमनताई पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ज्याच्या घरात ४५ वर्षे सत्ता आहे. त्यांनी उपोषणाचा इशारा द्यावा, ही आगतिकता आहे. आमदार सुमन पाटील यांना आपल्या सुपुत्राच्या भवितव्याची चिंता वाटते आहे, त्या पुत्रप्रेमात आंधळ्या झाल्या आहेत, अशी टीका खासदार संजय पाटील यांनी केली.

टेंभू योजनेतून आठ गावांसाठी पाणी द्यावे, यासाठी उपोषण म्हणजे आबा कुटुंबाच्या ४५ वर्षांच्या अपयशाची कबुली आहे. जिल्हा परिषद सदस्य ते उपमुख्यमंत्रिपदापर्यंत ज्या सावळज परिसराच्या जिवावर मजल मारली, त्या गावांना हक्काचे पाणी दिले नाही.

वंचित गावाचा टेंभू विस्तारित योजनेमध्ये समावेशासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता अंतिम टप्प्यात आणली आहे. हे सांगितल्यानंतर उपोषणाची नौटंकी व राजकीय स्टंटबाजी सुरू आहे, असा टोला खासदार संजय काका पाटील यांनी लगावला.

आर. आर. पाटील यांच्या काळातील भाषणे, घोषणा, आश्वासनांची जंत्री बाहेर काढावी लागेल. त्यांनी जनतेला कसे भुलवले, याचा हिशेब मांडावा लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला. येत्या महिनाभरात विस्तारित टेंभू योजनेची सुधारित प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. या गावांना पाणी येणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.

Tembhu Water Scheme
Drought in Sangli : सांगली जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा, ५०० पेक्षा जास्त गाव, वाडयांना टँकरने पाणीपुरवठा

सुमनताई पाटील यांची मागणी काय?

कोल्हापूर जिल्ह्यातील तासगाव -कवठेमहांकाळ या कायमस्वरूपी दुष्काळाचा कलंक लागलेल्या मतदारसंघातील सावळज, सिद्धेवाडी, दहीवडी, जरंडी, वायफळे, यमगरवाडी, बिरणवाडी आणि डोंगरसोनी ही आठ गावे टेंभू योजनेच्या पाण्यापासून गेली अनेक वर्षे वंचित आहेत.

या आठ गावांचा टेंभू योजनेत समावेश करून त्यांना हक्काचे पाणी देण्याची मागणी केली आहे. टेंभूच्या तृतीय सुधारित प्रशासकीय अहवालास मान्यता मिळेपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आमदार पाटील यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. आमदार पाटील ह्या २ ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com