Bamboo Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Bamboo Farming : राज्यात बांबू लागवडीचा मुख्यमंत्री घेणार आढावा

Bamboo Production : वातावरणीय बदलामुळे कोरडवाहू शेती धोक्यात आली आहे. पिकांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यातील बांबू लागवडीस प्रोत्साहन देऊन त्याचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यीय कृती दलाची नुकतीच स्थापना करण्यात आली आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री या दलाचे सहअध्यक्ष असणार आहेत.

वातावरणीय बदलामुळे कोरडवाहू शेती धोक्यात आली आहे. पिकांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. विदर्भ व मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये वारंवार पडणारा दुष्काळ व अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे.

बांबू हे पीक कमी पाण्याचे असून जास्त प्रमाणात कार्बन शोषून घेणरो असल्यामुळे पर्यावरणस्नेही आहे. राज्य सरकारने राज्यात बांबू लागवडीस रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले आहे. या लागवडीसंदर्भात राज्य सरकार वेळोवेळी आढावा घेणार असून, याकरिता स्वतंत्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे.

...असे आहे कृती दल

या कृती दलात अध्यक्ष : मुख्यमंत्री, सह अध्यक्ष : दोन्ही उपमुख्यमंत्री, सदस्य : महसूलमंत्री, वनमंत्री, ग्रामविकासमंत्री, कृषिमंत्री, आदिवासी विकासमंत्री, जलसंधारणमंत्री, रोजगार हमीमंत्री, पाशा पटेल (अध्यक्ष, राज्य कृषी मूल्य आयोग) यासह या विभागांचे मुख्य/प्रधान/सचिव दर्जाचे अधिकारी, रोहयोचे मुख्य सचिव/प्रधान हे सदस्य सचिव आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT