Bamboo Cultivation : भूस्‍खलन रोखण्यासाठी बांबूची बेटे तयार करणार

Bamboo Farming : मातीची धूप थांबवण्यासाठी बांबूचे झाडे फायदेशीर ठरतात. जिल्ह्यातील दरडग्रस्त भागात बांबूची लागवड करण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे.
Bamboo Processing
Bamboo ProcessingAgrowon
Published on
Updated on

Alibaug News : मातीची धूप थांबवण्यासाठी बांबूचे झाडे फायदेशीर ठरतात. जिल्ह्यातील दरडग्रस्त भागात बांबूची लागवड करण्यावर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. बांबूपासून रोजगार निर्मितीला चालना मिळण्याबरोबरच भुस्खलन रोखता येणार असल्‍याने जिल्ह्यात सुमारे सात लाखांपेक्षा अधिक रोपे लावून बांबूची बेटे तयार करण्याचा संकल्‍प जिल्‍हा परिषद आणि प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

अतिवृष्टीमध्ये गतवर्षी जिल्ह्यातील अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पोलादपूर, कर्जत तालुक्यासह महाडमध्ये दरड कोसळली होती. डोंगराळ भागातील अनेक झाडे उन्मळून पडली होती. दगड-मातीच्या ढिगाऱ्यांमुळे गावे चिखलमय झाली होती. महाड येथील दुर्घटनेनंतर रायगड जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेत दरड रोखण्यासाठी बांबू लागवडीला प्राधान्य दिले आहे.

Bamboo Processing
Bamboo Farming : बांबू लागवडीसाठी शासकीय योजनेचा लाभ घ्या

जिल्‍ह्यातील डोंगरभागात वर्षभरात जवळपास सुमारे दोन लाख बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. बांबूचे मूळ माती धरून ठेवतात. मातीची धूप रोखण्यास मदत होते, हे लक्षात आल्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी पुढाकार घेत गावे-वाड्यांमध्ये बांबूची लागवड सुरू केली आहे.

यासाठी तालुका, ग्रामपंचायत स्तरावर स्वयंसेवी संस्था, स्वदेश फाउंडेशन, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्वयंसेवक, स्वयंसहायता बचत गट, गावातील महिला मंडळे, भजनी मंडळे व युवकांना सहभागी करून घेतले जात आहे. जिल्ह्यात सुमारे सात लाखांपेक्षा अधिक बांबूची बेटे तयार करण्याचा संकल्‍प जिल्‍हा परिषद आणि प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

Bamboo Processing
Bamboo Processing : बांबूपासून आता विमानतळे, मेट्रो स्टेशन अन् इमारतींच्या फरशी!

खोपोली शहरातील सुभाषनगर, काजूवाडी तसेच बीड खुर्द गावात बांबू लागवडीद्वारे मातीची धूप थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नुकतीच या गावांत बांबूच्या रोपांची लागवड करण्यात आली. बांबू लागवडीच्या उपक्रमाची सुरुवात तहसीलदार आयुब तांबोळी आणि खालापूर तालुका वन अधिकारी कुलदीप पाटकर यांच्या हस्ते झाली.

व्यवसायवृद्धीला चालना मिळणार

ग्रामीण जिल्हा असल्याने बांबूपासून तयार होणाऱ्या उपकरणांना पसंती दर्शविली जाते. टोपली, सूप, झोपाळा, बांधकाम व्यवसाय, खुर्ची, आराम खुर्ची, डायनिंग सेट, सोपा सेट, टीपॉय, शो-पीस, विद्युत दिवे, बेड, ट्रॉली, परडी आदी फर्निचर बनविण्याचे काम बांबूपासून केले जाते. वेगवेगळ्या ठिकाणी बांबूच्या गॅलरी उभ्या होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यात बांबू लागवडीमुळे व्यवसाय वृद्धीला चालना मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com