Chief Minister Eknath Shinde  Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Mukti Sangram Din 2024 : मराठवाड्याच्या विकासासाठी १४३४ कोटींची तरतूद : मुख्यमंत्री शिंदे

Chief Minister Eknath Shinde : मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच उद्दिष्ट्य सरकारचे आहे. यासाठी मराठवाड्यात विविध उपक्रम आणि योजना आखल्या जात आहेत. त्यासाठी १४३४ कोटींची तरतूद केल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : मराठवाड्याचा दुष्काळ आणि मागसलेपण संपवण्यासाठी महायुतीचे सरकार कटीबद्ध आहे. त्यासाठी मराठवाड्यात नदीजोड प्रकल्पासह अनेक योजना आखल्या जात आहेत. तर मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या विकासासाठी १ हजार ४३४ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ते मंगळवारी (ता.१७) छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विरोधी पक्ष नेते आंबादास दानवे, माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार प्रशांत बंब, माजी खासदार चंद्रकांत खैरे, माजी महापौर नंदकुमार घोडेल यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

स्मृती स्मारकाच्या उभारणी १०० कोटी

गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याची स्मृती जपण्यासाठी स्मृती स्मारकाची उभारणी केली जाणार होती. त्याकामासाठी १०० कोटी रुपये निधी दिला होता. तसेच आठ जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपये दिले. सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी शासनाने ठोस पाऊले उचलल्याचेही शिंदे म्हणाले.

नदी जोड प्रकल्प

तसेच मराठवाड्यातला दुष्काळ निवारणासाठी समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवले जाणार आहे. त्यासाठी १५ हजार कोटीं रुपयांच्या योजनेंचा अहवाल तयार केला जातोय. ज्यात दमणगंगा (एकदरे) गोदावरी (वाघाड), दमणगंगा वैतरणा – गोदावरी (कडवा देव नदी) आणि पार-गोदावरी नदीजोड योजनांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी देखील २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचं काम सुद्धा हाती घेण्यात आलं आहे.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी वाढीव तरतुद

ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतुद करण्यात आली आहे. यात मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. तर दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी आठही जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-१ जाईल. जो एनडीडीबी आणि मदर डेअरीच्या सहकार्याने २०२७ पर्यंत असेल. या प्रकल्पासाठी १४९ कोटी रुपयांना मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे.

लाडकी बहीण योजनेचा भगिनींना लाभ

कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना ५ हजार कोटींचे अनुदान मंजूर केलं आहे. खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्यात येत आहेत. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मराठवाड्यातल्या भगिनींना लाभ मिळाला आहे. आतापर्यंत १ कोटी ६० हजार भगिनींच्या खात्यात सुमारे ५ हजार कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षातून तीन वेळा गॅस सिलेंडर मोफत दिले जातील. याचा देखील फायदा मराठवाड्यातल्या गरीब महिलांना होणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Fragmentation Act: शहरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची महसूल मंत्री बावनकुळे यांची विधानसभेत घोषणा

QR Code For fertilizer: ‘क्यूआर कोड’वरून कळणार उपलब्ध खते

Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

Dahanu Floods: डहाणूमध्ये सूर्या नदीला पूर; सतर्कतेचा इशारा

Tree Plantation: दहा हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

SCROLL FOR NEXT