Eknath Shinde Resign Agrowon
ॲग्रो विशेष

Eknath Shinde Resign : एकनाथ शिंदे यांच्यासह फडणवीस आणि अजित पवार यांचा राजीनामा; १४ व्या विधानसभेचा कार्यकाळही आज संपणार

Eknath Shinde has resigned as Maharashtra Chief Minister : १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज (ता.२६) संपत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून ७२ तासानंतरही राज्याचा मुख्यमंत्री ठरलेला नाही. यातच आज (ता.२६) महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द केला.

राज्यपाल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह फडणवीस आणि अजित पवार यांचा राजीनामा स्वीकारला आहे. पण सरकार स्थापनेपर्यंत एकनाथ शिंदे हेच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहतील, अशीही माहिती समोर आली आहे.

आज कार्यकाळ संपणार

१५ व्या विधानसभेचा निकाल स्पष्ट झाला असून १४ व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत आहे. पण महायुतीकडे बहुमतापेक्षा अधीक बहुमत असल्याने राज्यात राष्ट्रपती लागवड लागू होणार नाही. पण मुख्यमंत्र्यासह देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या राजीनाम्यानंतर नव्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा होणार आहे.

सध्या राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्री पदासाठी दबावतंत्र वापरला जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येऊन महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्याचे नाव घोषित करणार आहे.

विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ जागांपैकी २३० जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. तर अजित पवार गटाने फडणवीस यांना आपला पाठिंबा दिला आहे. यामुळे युतीच्या सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपदी देण्यात यावेत म्हणून दिल्लीत भाजपवर दबाव टाकला जात आहे. पण शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून दबाव टाकला जात असल्याची चर्चा रंगली आहे.

भाजपकडेच मुख्यमंत्रीपद

१५ व्या विधानसभेमध्ये महायुतीच्या सरकारमध्ये नवीन मुख्यमंत्री कोण असणार? मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे. पण यंदा महायुतीत भाजप मोठा भाऊ ठरला असून अजित पवार गटाचा भाजपला पाठिंबा आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील. भाजपकडे मुख्यमंत्रीपद जाणार असल्याचे निश्चित झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Cabinet : खानदेशात यंदा चौघांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता

Fertilizer Shortage : संयुक्त खताची टंचाई; पर्यायी खते वापरा

Jalgaon ZP : जिल्हा परिषदेत तक्रारी, अडचणींवर कार्यवाही होईना

Labor Shortage : यवतमाळ जिल्ह्यातील कामे मजुरांअभावी खोळंबली

Agrowon Podcast : कांदा भावात चढ उतार सुरु; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत आजचे लसूण दर?

SCROLL FOR NEXT