Vijay Vadettiwar on Mahayuti Sarkar
Vijay Vadettiwar on Mahayuti SarkarAgrowon

Vijay Wadettiwar : महायुती जिंकली अभिनंदन! पण, नवे सरकार शेतकऱ्यांसाठी काय करते? यावर आमचे लक्ष असेल; वडेट्टीवार यांचा इशारा

Assembly election results 2024 : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुती विजयी झाले आहे.
Published on

Pune News : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला आहे. तर काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता महायुतीचे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला असून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीला शुभेच्छा दिल्या आहेत. याचबरोबर त्यांनी आम्ही विरोधक म्हणून सरकारवर लक्ष ठेवू, असा इशारा दिला आहे.

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले असून महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले आहे. महायुतीला २३० तर मविआच्या पारड्यात फक्त ४६ जागा पडल्या आहेत. यावरून वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारच्या विरोधात लोकांच्यामध्ये आक्रोश असताना फक्त लाडकी बहीणीच्या नावाने पाच टक्के मतदान फिरू शकते का? असा सवाल त्यांनी केला आहे. तर दुसरा प्रयोग तर केला गेला नाही ना? असाही प्रश्न जनतेला पडल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

Vijay Vadettiwar on Mahayuti Sarkar
Ladaki Bahin Yojana : महिलांच्या बँक खात्यावर दर महिन्याला १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये जमा होणार का?

आता त्यांची सत्ता आली असून फडणवीस यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री म्हणून होत आहे. फडणवीस यांना आमच्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रातील नवे सरकार आल्यावर शेतकऱ्यांनासाठी काय करते? यावर विरोधक म्हणून आमचे लक्ष असणार आहे. महागाई, राज्यातील प्रश्न यावर आमची भूमिका आम्ही पार पाडू.

राज्यातील शेतकरी आजही संकटात असून सोयाबीन, कापूस विकला जात नाही. महागाई उच्चांकावर पोहचली आहे. मध्यमवर्गीयांचे जगणे कठीण झाले असून सरकारवर जनतेचा राग होता. पण असा अनाकलनीय निकाल आला आहे. याबद्दल जनतेसह आम्हालाही आश्चर्य वाटत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

Vijay Vadettiwar on Mahayuti Sarkar
Deputy Chief Minister Devendra Fadnavis : ३२ गावांना वर्षभरात पाणी देणार : फडणवीस

तर या विजयावरून भाजपवर टीका करताना वडेट्टीवार यांनी, भाजपने छोटे राज्य आम्हाला द्यायचे आणि मोठा राज्य बळकवण्याचा प्रकार केल्याचे म्हटले आहे. याआधी तेलंगाना दिले आणि मध्य प्रदेश घेतले. यानंतर जम्मु आणि काश्मीर दिले आणि हरियाणा घेतले आणि आता झारखंड दिले महाराष्ट्र घेतले. मग या लहान राज्यांकडेबोट करून सांगायचे की तेथे ईव्हीएम नाही का? हा भाजप महायुतीचा विजय नसून तर ईव्हीएमचा विजय असल्याचा दावा केला आहे.

वडेट्टीवार यांनी महायुतीतील ३४ ठिकाणी झालेल्या बंडखोरीवरून अमित शाह यांच्यावर निशाना साधला आहे. अमित शाह यांना भाजपचे चाणक्य म्हणतात. पण त्यांना महायुतीतील जागा वाटपाचा वाद सोडवता आला नाही, अशी टीका केली आहे.

दरम्यान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्यावरून त्यांना विचारले असता, आत्ताच आपल्याला याबाबत माहिती मिळाली आहे. प्रदेशाध्यक्ष पदाबाबत पटोले यांची भूमिकेची काहीही माहिती नाही. आपण याबाबत माहिती घेत असल्याचेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com