Bogus Seed Sell Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seed : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी सीमावर्ती भागात तपासणी

Illegal Seed : खानदेशात कापूस व अन्य पिकांचे बोगस, बेकायदेशीर बियाणे गुजरात, मध्य प्रदेशातून येते.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात कापूस व अन्य पिकांचे बोगस, बेकायदेशीर बियाणे गुजरात, मध्य प्रदेशातून येते. ही समस्या रोखण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेशातील सीमा, नाक्यांवर तपासणी केली जाणार आहे. बोगस बियाणे आढळल्यास लागलीच पोलिस कारवाई केली जाणार आहे.

याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस व कृषी विभाग यांच्यात समन्वय राखून कार्यवाही केली जाणार आहे. वरिष्ठांनी याबाबत सूचना दिल्याची माहिती आहे. जून महिन्यात खरीप हंगाम सुरू होणार आहे.

शेतकरी बांधवांना कापसाचे बीटी बियाणे वेळेवर उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होऊ नये, यासाठी जिल्ह्यात १६ भरारी पथके तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी दिली.

या पथकांमार्फत बोगस बियाणे, खते व कीटकनाशक विक्रीला आळा घालण्यात येणार आहे. कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४ चे नियोजन केले आहे. रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय एक व तालुकास्तरीय १५, असे एकूण १६ भरारी पथकांची स्थापना केली आहे.

यामुळे शेतकरी बांधवांची फसवणूक टळेल व अनधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास मदत होईल. खरीप हंगाम सुरू झाल्यानंतर खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होते. या कालावधीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून शेतकऱ्यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे.

बियाणे खरेदीची पावती, बियाणे पाकिटांचा टॅग व लॉट नंबर शेतकऱ्यांनी पडताळून पाहावा, तसेच बियाणे पाकिटे पीक निघेपर्यंत जपून ठेवावे. अनधिकृत/विनाबिलाने बियाणे खरेदी करू नये. कीटकनाशक, तणनाशके आदी खरेदी करताना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी.

बियाणे, खत घेताना पक्के बिल घ्या

खत खरेदी करताना रीतसर बिल घ्यावे. कुणी खत विक्रेता जास्त दराने युरियासारख्या अनुदानित खतांची विक्री करीत असेल, तर त्याबाबत लेखी तक्रार तालुका कृषी अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषी अधिकारी कार्यालयास करावी, तसेच एचटीबीटी कापूस वाणाचे अवैध व विनाबिलाने खरेदी करू नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करीत असल्याचे दिसून आल्यास दूरध्वनी क्रमांक ०२५७-२२३९०५४ किंवा भ्रमणध्वनी ९८३४६८४६२० या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jackfruit Farming : कोकणात प्रक्रियेतून फणसाला मिळतेय नवी झळाळी

AI In Sugar cane: ऊस लागवडीत ‘एआय’ तंत्र वापरणार

Local Self Government : स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

SCROLL FOR NEXT