Bogus Seed
Bogus SeedAgrowon

Bogus Seed : बोगस बियाण्यांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत

Kharif Season : बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करून अहवाल तयार करावेत. त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारात येऊ नयेत, यासाठी लक्ष ठेवावे.
Published on

Pune News : बियाणे, कीटकनाशकांच्या बाबतीत जिथे तक्रार येईल तिथे लगेच तपासणी करून अहवाल तयार करावेत. त्याचप्रमाणे बोगस बियाणे बाजारात येऊ नयेत, यासाठी लक्ष ठेवावे. बोगस असल्याचे निदर्शनास येताच तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या.

जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक बुधवारी (ता.१७) जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेण्यात आली होती. त्या वेळी डॉ. श्री दिवसे बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, विभागीय कृषी सहसंचालक रफीक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे आदी उपस्थित होते.

Bogus Seed
Bogus Seed Act : प्रस्तावित कृषी कायद्यांना सीड इंडस्ट्रीचाही तीव्र विरोध ; ‘सियाम’चा बंदला पाठिंब्याची घोषणा

श्री दिवसे म्हणाले, की भारतीय हवामान शास्त्र विभागाने या वर्षी सरासरीपेक्षा अधिक म्हणजेच चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून ही बाब समाधानाची आहे. त्यामुळे विभागाने कृषी विकासासाठी लघुकालीन आणि दीर्घकालीन कार्यवाहीकडे लक्ष द्यावे. नैसर्गिक शेतीचे प्रमाणीकरण आणि त्यासाठी परिसंस्था निर्माण केल्याशिवाय नैसर्गिक शेतीला चालना मिळणार नाही. त्यादृष्टीने प्रयत्न करावेत.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध राहतील, यावर लक्ष केंद्रित करावे. खतनिर्मिती कंपन्यांनी कोणत्याही परिस्थितीत बफर साठ्यासाठी त्यांना निश्चित करून दिलेला पुरवठा करावा. खतांच्या वाहतुकीबाबत योग्य ते नियोजन करावे. युरिया खताच्या पुरवठ्याबाबत नियोजन करावे, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

Bogus Seed
Bogus Seed : अकोले तालुक्यात सदोष बियाण्यांमुळे भातांचे नुकसान

खरिपातील सर्व पिकांच्या बियाण्यांच्या उपलब्धतेबाबत आढावा घेऊन सोयाबीन लागवडीला चालना देताना घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. तसेच शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पडीक जमिनीवर बांबू लागवडीचा उपक्रम राबविण्यास चालना द्यावी.

खतांचा १०,३३० टनाचा होणार संरक्षित साठा

पुणे जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र सुमारे दोन लाख हेक्टर आहे. गेल्या तीन हंगामात सुमारे ३० हजार क्विंटल बियाण्यांची विक्री झाली असून, या वर्षी ३६ हजार क्विंटलच्या मागणीनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या वर्षी टनानुसार खताचा पुरवठा होत आहे.

युरियाची होणारी मागणी पाहता शासनाने जिल्हा प्रशासनाच्या मागणीनुसार जिल्ह्यात खतांचा १० हजार ३३० टन संरक्षित साठा (बफर स्टॉक) करण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार युरियाचा ९ हजार ४६० टन आणि डीएपीचा ८७० टनचा बफर साठा करण्यात येणार आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com