Ladki Bahin Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार ? आदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची अपडेट

Latest Update Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींच्या मतांच्या जोरावर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. आतापर्यंत या योजनेचे १५०० रुपये प्रमाणे ७ हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत.

Mahesh Gaikwad

Pune News : विधानसभा निवडणुकांमध्ये गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यामुळे निवडणुकीनंतरही लाडक्या बहीणींचं कवित्व संपण्याचे नाव घेत नाही. अशातच आता राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी योजनेविषयी भाष्य केली आहे.

लाडक्या बहीणींच्या मतांच्या जोरावर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत आले आहे. आतापर्यंत या योजनेचे १५०० रुपये प्रमाणे ७ हप्ते लाभार्थी महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. असे असले तरी, निवडणुकीत योजनेचा हप्ता वाढवून २१०० रुपये करण्याचे आश्वानसन तत्कालीन महायुतीने दिले होते. अशातच लाडकी बहीण योजनेच्या निकषांची चर्चा सुरू झाली आहे.

यासंदर्भात मंत्री तटकरे यांनी रायगड येथे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाला की, लाडकी बहीण योजना तशीच सुरू राहणार आहे. योजनेचा एकही निकष सरकारने बदललेला नाही. यापुढेही योजनेचे निकष बदलले जाणार नसल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, चालू वर्षात दोन कोटी ४१ लाख लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ मिळाला आहे. या लाडक्या बहिणी स्वत:हून पुढे येऊन योजनेमुळे झालेल्या फायद्यांबाबत सांगत आहेत.

तसेच अनेक महिलांनी स्वत: लाभ नको म्हणून सांगितले आहे. पण विरोधकांना या योजनेमुळे धडकी भरली असून ते योजनेबाबत चुकीचा प्रचार करत असल्याचे तटकरे म्हणाल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT