Flood Management  Agrowon
ॲग्रो विशेष

Flood Management : चंद्रपूरच्या पूरग्रस्त भागात तत्काळ उपाययोजना करा

Chandrapur Flood : चंद्रपूर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना राहण्याच्या सोयीकरिता गावातील शासकीय, निमशासकीय असलेल्या इमारती तसेच शाळा, महाविद्यालये येथे आश्रय देण्याकरिता चांगली व्यवस्था करावी.

Team Agrowon

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना राहण्याच्या सोयीकरिता गावातील शासकीय, निमशासकीय असलेल्या इमारती तसेच शाळा, महाविद्यालये येथे आश्रय देण्याकरिता चांगली व्यवस्था करावी.

पूरबाधित गावात धान्य आणि किराणाची कमतरता पडणार नाही, या बाबत दक्ष राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिल्या. गुरुवारी (ता. १०) सावली आणि पोंभुर्णा तालुक्यांतील पूरग्रस्त भागाला भेट देऊन बाधित क्षेत्राची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.

जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे अनेक तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही तालुक्यांना पुराचा चांगलाच तडाखा बसला आहे. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सावली तहसील कार्यालयात तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, की पूर परिस्थिती दरम्यान शेती पीक, मनुष्यहानी, पशुहानी, घर, गोठा व वीज पडून झालेल्या नुकसानीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्वरित पंचनामे करावे. तसेच जे पूल पाण्याखाली गेले आहेत त्या ठिकाणी पोलिस विभागाने तत्काळ बॅरीकेट लावावे.

पोलिस कर्मचाऱ्यांची नेमणूक करून जीवितहानी होणार नाही, या बाबत दक्षता घेण्यात यावी. पूर परिस्थितीत आपदा मित्र येथील कर्मचाऱ्यांनी जीवितहानी टाळण्याकरिता २४ तास सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या.

या वेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सावली तालुक्यातील जिबगाव-सिर्सी- साखरी हरांबा व व्याहाड बुज- वैनगंगा नदी मार्गाची व पूर परिस्थिती बाधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच जिबगांव येथील ग्रामस्थ, सरपंच यांच्याशी संवाद साधला.

पाहणीदरम्यान उपविभाग अधिकारी अजय चरडे, तहसीलदार प्रांजली चिरडे, गटविकास अधिकारी संजय नैताम, ठाणेदार श्री. पुल्लरवार, वैद्यकीय अधिकारी श्री. चौधरी, मुख्याधिकारी श्री. डोये यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

पोंभुर्णा तालुक्यात पूरग्रस्त भागाला भेट

वैनगंगा नदीच्या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी टोक गावास भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी गावाची व आसपासच्या परिसराची पाहणी केली.

या वेळी त्यांनी घाटकुळ दिशेने जाणाऱ्या पुलाचे निरीक्षण केले. या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. टोक गाव वैनगंगा नदीच्या पुरामुळे पूर्णतः पाण्याने वेढले गेले असून पाणीपातळी आणखी वाढली तर गावात येणारा एकमेव रस्ताही बंद होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian School of Agriculture : आंध्र प्रदेशात 'इंडियन स्कूल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर' स्थापन करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री नायडू यांचा प्रस्ताव

Maize Procurement: राज्यात गोदामांची अडचण, मक्याची उद्दिष्टाच्या निम्मी खरेदी

Combine Harvesters Distribution: कृषी प्रदर्शनात नोंदणी केलेल्या प्रीत कम्बाईन हार्वेस्टरचे वितरण

Fruit Farming: उत्तम दर्जाची फळे अन् थेट विक्रीतून नफा

Medicinal Farming: विविध औषधी वनस्पतींच्या शेतीचा यशस्वी प्रयोग

SCROLL FOR NEXT