Flood Management : कृष्णा-वारणा संभाव्य पूर धोका; जनावरांसाठी चारा छावण्यांचे नियोजन सुरू

Livestock Relief Camps : कृष्णा, वारणा नद्यांच्या संभाव्य पूरस्थितीसाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. या काळात सुमारे १०५ गावे बांधित होतात.
Flood Management
Flood ManagementAgrowon
Published on
Updated on

Sangli News : कृष्णा, वारणा नद्यांच्या संभाव्य पूरस्थितीसाठी प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. या काळात सुमारे १०५ गावे बांधित होतात. त्या गावांतील जनावरांसाठी पूरकाळात छावणी निर्माण करावी लागते.

तेथे चारा, पाणी आणि पशुखाद्य पुरवठ्यासठी पुरवठादारांनी आपली दरपत्रके सादर करावीत, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. एम. बी. गवळी यांनी केले. त्यासाठी सोमवारपर्यंत (ता. ३०) मुदत असेल.

कृष्णा नदीला आलेल्या २०१९ आणि २०२१ च्या महापुरांचा अभ्यास करून याबाबत धोरण निश्चित केले जाते. या काळात १०५ गावे बाधित झाली होती. तेथे जनावरांसाठी चारा छावण्या निर्माण कराव्या लागल्या होत्या.

Flood Management
Flood Management : संभाव्य पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

या गावांसाठीचे दरपत्रक जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सांगली (मुख्यालय, मिरज) यांचे कार्यालय डॉ. आंबेडकर रोड, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय आवार, मिरज यांच्या दालनात १ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता उघडण्यात येणार आहेत.

Flood Management
Flood Management Plan : संभाव्य पूरस्थितीचा आराखडा करा

छावणीत दाखल होणाऱ्या मोठ्या व लहान जनावरांना पिण्यासाठी पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे. शासन निकषाप्रमाणे छावणीत दाखल झालेल्या प्रत्‍येक मोठ्या व लहान जनावरास प्रतिदिन वाळलेला किंवा हिरवा चारा व पशुखाद्य देणे गरजेचे आहे.

मका, ऊस, उसाचे वाढे अशा स्वरूपात हिरवा चारा आठवड्यातून तीन दिवस पशुखाद्य, वाळलेला चारा म्हणून कडबा किंवा कडब्याची कुट्टी, वाळलेले गवत, मक्याचा मुरघास देणे बंधनकारक राहणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com