Rain Alert Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Alert : विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

IMD rainfall alert : आज (ता. १९) विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

Maharashtra weather alert : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. आकाश ढगाळ झाले असून, तुरळक ठिकाणी हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. आज (ता. १९) विदर्भासह, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. तर विदर्भासह, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे पश्‍चिम टोक हिमालयाच्या पायथ्याकडे कायम आहे. पूर्व टोक त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या दक्षिणेकडे आले आहे. पूर्व टोक पुढील तीन ते चार दिवस दक्षिणेकडे राहण्याची शक्यता आहे. मॉन्सूनचा आस गोरखपूर, देहरी, रांची, बालासोर, कमी दाबाचे केंद्र ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

राज्यात ढगाळ हवामान होत असून, उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. आज (ता. १९) विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा आहे. उर्वरित विदर्भासह मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता आहे.

उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. काहीशी दक्षिणेकडे झुकलेली ही प्रणाली उत्तर ओडिशा आणि उत्तर छत्तीसगडकडे सरकत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT