Chana Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Sowing : नांदेडला पावणेदोन लाख हेक्टरवर हरभरा पेरणी

Post Monsoon Rain : जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मान्सून्नोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यात पिकांचे नुकसान झाले असले तरी रब्बीच्या हंगामाला बळकटी मिळाली आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्यात मान्सून्नोत्तर पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. यात पिकांचे नुकसान झाले असले तरी रब्बीच्या हंगामाला बळकटी मिळाली आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख ३७ हजार ४२६ हेक्टरवर म्हणजेच सर्वसाधारण क्षेत्राच्या १०५ टक्के झाली आहे. यात सर्वाधिक पावणेदोन लाख क्षेत्रावर हरभरा पेरणी असल्याची माहिती कृषी विभागातून देण्यात आली.

जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात चार लाख हेक्टरवर पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला होता. परंतु, यंदा परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे रब्बी पेरणीचे क्षेत्र घटले होते. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये मॉन्सून्नोत्तर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली.

यामुळे काही ठिकाणी अतिवृष्टी नोंदली गेली. त्यामुळे कपाशी, तूर या पिकांचे नुकसान झाले असले तरी जमिनीतील ओलावा वाढला. तसेच जिल्ह्यातील नदी, नाले वाहून प्रकल्पातील पाणीसाठाही वाढला आहे. त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांसाठी होणार आहे.

नोव्हेंबरअखेरपर्यंत निम्म्यापेक्षाही कमी क्षेत्रावर पेरणी झाली होती. या काळात झालेल्या पावसामुळे काही दिवस खंड पडला. मात्र गेल्या आठवडाभरापासून शेतकऱ्यांनी रब्बी पेरणीला पुन्हा सुरुवात केली आहे.

जिल्ह्यातील रब्बी हंगामाची पेरणी (हेक्टरमध्ये)

पीक सर्वसाधारण क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी

ज्वारी ३२,६९९ २२,७७९ ६९.६६

गहू २९,७१३ २३,१५८ ७७.९४

हरभरा १,५३,३७० १,७६,४०१ ११५.०२

करडई २,४६४ ५,८७७ २३८.५१

सूर्यफूल ६५ ५३ ८१.५४

रब्बी तीळ ४० ३२ ८०.००

एकूण २,२४,६३४ २,३७,४२६ १०५.६९

रब्बी हंगामात सुरुवातीला जमिनीत फारसा ओलावा नसल्याने शेतकऱ्यांनी कमी पेरण्या केल्या. नंतर झालेल्या मान्सून्नोत्तर पावसामुळे पेरणीच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झाली. आगामी काळात चारा उपलब्ध व्हावा, यासाठी शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीला प्राधान्य द्यावे.
भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT