Post Monsoon Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसाने ६० हजार हेक्टरवरील पिकाला फटका

Crop Damage : प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड जिल्ह्यांतील ६१३ गावांत मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे जवळपास ६० हजार १५८.३६ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : गत दोन-तीन दिवसांत मॉन्सूनोत्तर पावसाने वादळ व काही ठिकाणी तुरळक गारपिटीसह लावलेल्या हजेरीने जवळपास ४७ हजार १५८.३६ हेक्टरवरील पिकाला दणका बसला असल्याचा प्राथमिक अंदाज महसूल प्रशासनाने दिला आहे. मंगळवारी (ता. २८) रोजी दिलेल्या या अंदाजात अतिवृष्टी झालेल्या हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील नुकसानीचा समावेश नाही.

प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड जिल्ह्यांतील ६१३ गावांत मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे जवळपास ६० हजार १५८.३६ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ५०९ गावात जवळपास ४६ हजार २०२ हेक्टरवर झाले.

Crop Damage
Crop Damage : बुलडाणा जिल्ह्यात ३६ हजार हेक्टरवर पिके मातीमोल

यामध्ये जिरायत २१ हजार ३४९ हेक्टर, बागायत २४ हजार ७८९ हेक्टर, तर फळपिकांचे जवळपास ६४ हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पाठोपाठ जालना जिल्ह्यातील १५ गावांतील १३ हजार ४९ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये जिरायत २ हजार ९३८ हेक्टर, बागायती ६ हजार ६२३ हेक्टर तर फळ पिकांचे ३ हजार ४८८ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील नुकसानीचा समावेश आहे.

या पाठोपाठ परभणी जिल्ह्यातील ७५ गावांतील ५३३.३६ हेक्टर जिरायत, ६६ हेक्टर बागायत व ९३ हेक्टर फळ पिकांच मिळून ६९२.३६ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. बीडमधील १४ गाव शिवारांतील २१५ हेक्टर जिरायत पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Crop Damage
Crop Damage : पावसाने साडेआठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

१८५ दुभत्या जनावरांचा मृत्यू

प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांतील लहान, मोठ्या १८५ दुभत्या जनावरांचा गारपीट व वीज पडल्यामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये ३० मोठ्या दुधाळ, तर १५५ लहान दुधाळ जनावरांचा समावेश आहे. ओढकाम काम करणाऱ्या १४ मोठ्या व आठ लहान जनावरांचाही नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झाला आहे. याशिवाय हिंगोली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

३८ घरांची पडझड

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांतील २४ कच्च्या घरांचे नुकसान झाल असून, परभणी जिल्ह्यातील १४ झोपड्यांची पूर्णतः पडझड झाली आहे. याशिवाय परभणी जिल्ह्यातील आठ गोठ्यांचे अवेळी झालेल्या वादळी जोरदार पावसात नुकसान झाल्याचे प्रशासनाच्या प्राथमिक अहवालात नमूद आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com