Chana Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Sowing : खानदेशात हरभरा पेरणी पूर्ण

Rabi Chana Crop : खानदेशात हरभऱ्याची पेरणी पूर्ण होत आली आहे. क्षेत्र यंदा सुमारे १० हजार हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे. पावणेदोन लाख हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात हरभऱ्याची पेरणी पूर्ण होत आली आहे. क्षेत्र यंदा सुमारे १० हजार हेक्टरने क्षेत्र कमी झाले आहे. पावणेदोन लाख हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती आहे. यंदा ओलावा कमी होता. तसेच कमी पाऊसमान राहिल्याने जलसाठे कमी आहेत. यामुळे पेरणीवर परिणाम झाल्याची माहिती आहे. परंतु पेरणीत मोठी घट झालेली नाही.

अनेकांनी मका, ज्वारीऐवजी हरभऱ्याची पेरणी केली आहे. खानदेशात मागील तीन वर्षे रब्बीची चार लाख हेक्टरवर पेरणी झाली. त्यात हरभऱ्याची सर्वाधिक एक लाख ९० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा मात्र पेरणीत घट होईल, असे मानले जात होते. परंतु हरभऱ्याचे क्षेत्र फारसे घटणार नाही, असाही अंदाज होता. कारण हरभरा कमी खर्च व कमी पाण्यात येणारे पीक आहे.

यंदा पेरणीत काहीशी घट सध्या दिसत आहे. परंतु काही शेतकरी काबुली किंवा डॉलर (मॅक्सिको) हरभऱ्याची पेरणी करतील. यामुळे क्षेत्रात किंचित वाढही दिसू शकते. ही पेरणी धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल भागांत होईल.

ती तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर होईल, असे सांगितले जात आहे.कोरडवाहू हरभऱ्याची पेरणी यंदा कमी झाली आहे. ही पेरणी करण्यासाठी अनेकांना वेळ साधता आली नाही. कारण सोयाबीनचे पीक उशिरा आले. त्यात पूर्वमशागत करतानाच वेळ लागला. याच काळात जमिनीतील ओलावा कमी झाला.

...या भागात पसंती

हरभरा पेरणीस खानदेशात जळगावमधील रावेर, यावल, चोपडा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागांतील शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. मका पीक खर्चिक बनले आहे. त्यास पाणी व फवारण्या अधिक लागतात. तसेच अमेरिकन लष्करी अळीचेही संकट असते. यामुळे अनेकांनी मका पिकाऐवजी हरभऱ्याची पेरणी केली आहे.

‘काबुली’ सुमारे ३० हजार हेक्टरवर

खानदेशात केळी, पपई आदी पिकांसाठी हरभरा पिकांचे बेवड चांगले मानले जाते. यातूनही अनेकांनी जमिनीचा पोत, सुपीकता आदी बाबी लक्षात घेऊन हरभरा पेरणी केली आहे. काबुली हरभऱ्याची पेरणी खानदेशात सुमारे ३० हजार हेक्टरवर झाली आहे.

यात मोठा काबुली किंवा डॉलर हरभऱ्याची पेरणी सुमारे ११ हजार हेक्टरवर झाल्याचा अंदाज आहे. हरभरा पीक तापी, गिरणा, अनेर, पांझरा आदी नद्यांच्या क्षेत्राचे पारंपरिक पीक आहे. याच भागात पेरणी अधिक आहे, अशी माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dragon Fruit Production: ड्रॅगन फ्रूटची प्रतिवर्ष चार हजार हेक्टर वाढ

Bedana Demand: बेदाण्याला मागणी, उठाव कमी

Climate Change: सरासरी पाऊसमान होऊनही उकाडा कायम

Monsoon Rain: पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज कायम

Cotton Crisis : १७ सप्टेंबरपासून संयुक्त किसान मोर्चा विदर्भ दौऱ्यावर; कापूस धोरण, टॅरिफ आणि आत्महत्यावर शेतकऱ्यांशी संवाद

SCROLL FOR NEXT