Chana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Harvesting : हरभरा पीक काढणीच्या अवस्थेत

Chana Farming : सध्या हरभरा पिके काढणीच्या अवस्थेत असून, पुढील आठवड्यापासून काढणीला सुरुवात होईल.

Team Agrowon

Pune News : रब्बी हंगामात उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने शेतकऱ्यांनी हरभरा पिकाला मोठी पसंती दिली आहे. सध्या हरभरा पिके काढणीच्या अवस्थेत असून, पुढील आठवड्यापासून काढणीला सुरुवात होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

उशिराने थंडी वाढल्याने हरभरा पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पुणे विभागात एक लाख ८२ हजार ११९ हेक्टरपैकी एक लाख ६८ हजार १२ हेक्टर म्हणजेच ९२ टक्के इतक्या पेरण्या झाल्या आहेत. नगर, सोलापूर जिल्ह्यांत पिकाची चांगलीच वाढ झाली असून घाटे पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. विभागात सरासरीच्या तुलनेत १४ हजार १०७ हेक्टरने पेरणीच्या क्षेत्रात घट झाली असल्याने उत्पादनातही काहीशी घट होण्याची शक्यता आहे.

यंदाही शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांची पेरणी केली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी हरभरा पिकांमध्ये कृषी विद्यापीठाकडील विविध वाणांच्या हरभऱ्याची पेरणी केली आहे. पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. परंतु ज्या ठिकाणी ओल कमी आहे, अशा ठिकाणी कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.

विभागात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक हरभऱ्याची पेरणी झाली असून सरासरीच्या १६ हजार ९५० हेक्टरपैकी १३ हजार ६३३ हेक्टर म्हणजेच ८० टक्के पेरणी झाली आहे. तर दक्षिण सोलापूर, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा या तालुक्यांत चांगली पेरणी झाली आहे.

तर पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला या तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात १० हजार ७७२ हेक्टरपैकी सुमारे १२ हजार १३६ हेक्टर म्हणजेच ११३ टक्के पेरणी झाली आहे. तर नगर, पारनेर, जामखेड, पाथर्डी, अकोले, श्रीरामपूर, राहाता या तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक, तर श्रीगोंदा, शेवगाव, नेवासा, राहुरी, कोपरगाव या तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून, सरासरीच्या १० हजार ३८५ हेक्टरपैकी ४ हजार ६२० हेक्टर म्हणजेच ४४ टक्के पेरणी झाली आहे. तर उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे, तेथे हरभरा पिके काढणीच्या अवस्थेत असून काही ठिकाणी सुरुवात झाली आहे.

जिल्हानिहाय झालेली हरभरा पिकांची पेरणी (हेक्टरमध्ये)

जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्के

नगर ८८,३७७ ९६,०२९ १०९

पुणे ३४,३३० २२,८८९ ६७

सोलापूर ५९,४१२ ४९,०९४ ८३

एकूण १,८२,११९ १,६८,०१२ ९२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधात ‘चक्का जाम’

Sugarcane Productivity : ‘हेक्टरी १२५ टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानास कोल्हापुरात प्रारंभ

Agriculture Irrigation : गतवर्षीच्या तुलनेत सिंचनासाठी १६ टीएमसीने उपसा कमी

SCROLL FOR NEXT