Jyotiba Chaitra yatra Kolhapur Agrowon
ॲग्रो विशेष

भाविकांच्या उच्चांकी गर्दीत जोतिबाची चैत्र यात्रा

दोन वर्षांनी डोंगर झाला बोलका; भक्त गुलालानं लाल

टीम ॲग्रोवन

निवास मोटे : ॲग्रोवन वृत्तसेवा

जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर : दोन वर्षांपासून जोतिबा चैत्र यात्रेसाठी (Jyotiba Chaitra Yatra) आसुसलेल्या लाखो भाविकांनी शनिवारी (ता. १६) दिवसभर जोतिबा डोंगरावर हजेरी लावली. दोन वर्षांच्या निराशेला दूर सारत भाविकांनी (devotees) जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली. गर्दीने उच्चांक गाठला.
दोन वर्षांनी डोंगर बोलका झाला. गुलालानं लाल झालेले, घामानं भिजून चमकणारे आणि देवाच्या भेटीने उजळलेले भक्तांचे माणका सारखे लाखो चेहरे असे दृश्‍य होते. हलगी, घुमकं, सुंद्रीचा अखंड निनाद, मास्कच्या मुस्कटदाबीतून मोकळे झालेले श्‍वास, फुंकून वाजविलेल्या शिंग तुताऱ्यांनी डोंगर निनादून उठला.

डोंगरावर रंगीबेरंगी डोलणाऱ्या सासनकाठ्या हलगी पिपाणीच्या सनईच्या सुरावर नाचणारी तरुणाई. उन्हाचा कडाका (Heat Summer) आणि चांगभलंच्या जयघोषामुळे डोंगरावर यंदा भाविकांचा उत्साह दिसून आला. यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांतील लाखो भाविकांनी हजेरी लावली.
सकाळी पन्हाळ्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या हस्ते शासकीय महापूजा झाली. या वेळी प्रांताधिकारी अमित माळी, सचिव शिवराज नाईकवडे, अधीक्षक दीपक मेहतर, ग्रामस्थ पुजारी उपस्थित होते.

सायंकाळी पाडळी, विहे, किवळ, कसबे डिग्रज, मिरज तसेच इतर मानाच्या सासनकाठ्या दाखल झाल्या. विविध वाद्यांच्या गजरात या पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली. दुपारी बारा वाजता पालकमंत्री सतेज पाटील यांच्या (Guardian Minister Satej Patil) हस्ते सासनकाठ्यांची मिरवणूक सुरू झाली. मानाच्या काठ्या यमाई मंदिराकडे मार्गस्थ झाल्या.

जोतिबा डोंगर, जि. कोल्हापूर : दख्खनचा राजा जोतिबा यात्रेच्या मुख्य दिवशी शनिवारी (ता.१६) बांधलेली राजेशाही थाटातील बैठी महाअलंकारिक महापूजा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT