Organic Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Organic Farming : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सेंद्रिय शेतीप्रकल्पाला प्रमाणिकरण

MPKV Rahuri : सेंद्रिय शेतीला चालना मिळावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी, या साठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कृषी विद्यापीठाच्या परिसरात सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारले.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagar News : सेंद्रिय शेतीला चालना मिळावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी, या साठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कृषी विद्यापीठाच्या परिसरात सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारले. या प्रकल्पाला जयपूरच्या राज्य जैविक प्रमाणीकरण संस्थेकडून प्रमाणिकरण मिळाले आहे.

सेंद्रिय शेतीला चालना मिळावी तसेच शेतकऱ्‍यांना सेंद्रिय शेतीबद्दल मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने राहुरी येथे सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राची स्थापना २०१८-१९ मध्ये विद्यापीठ प्रक्षेत्रावर १८ हेक्टर क्षेत्रावर केली आहे.

सेंद्रिय शेती सुरू करून पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पात बहुविध पिके, मिश्रफळ शेती, विविध पूरक उद्योग, बायोगॅस व सेंद्रिय निविष्ठा निर्मिती आदींचे प्रयोग केले आहेत. त्यांचे सेंद्रिय प्रमाणीकरण राजस्थान राज्य जैविक प्रमाणीकरण संस्थेकडून नुकतेच करण्यात आले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील तसेच संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार यांचे या प्रकल्पासाठी मार्गदर्शन लाभले. कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, प्रकल्प सह-समन्वयक अधिकारी डॉ. उल्हास सुर्वे, सहयोगी प्राध्यापक डॉ. नितीन दानवले व प्रकल्पाचे सर्व वरिष्ठ संशोधन सहाय्यक, प्रक्षेत्र सहाय्यक यांचे मोलाचे योगदान राहिले.

राजस्थानच्या तज्ज्ञांकडून पाहणी

राजस्थान राज्य जैविक प्रमाणीकरण संस्था, जयपूर, राजस्थान येथील निरीक्षक मुकेश मीना यांनी प्रक्षेत्रावरील विविध पिकांची तसेच, देशी गायींचा गोठा, शेळीपालन, कुक्कुटपालन, जैविक निविष्ठा कक्ष, साठवण कक्ष, विक्री केंद्र यांची पाहणी व निरीक्षण केले. तसेच, त्यांनी प्रमाणीकरणाविषयी माहिती दिली. सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Irrigation Project: खानदेशातील सिंचन प्रकल्प रखडले

Revenue Day: महसूलच्या अधिकाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते गौरव

Encroachment Free Vanpuri: पुरंदर तालुक्यातील ‘वनपुरी’ ठरले पथदर्शी

ZP School Success: साखराच्या जि.प. शाळेचा प्रेरक प्रवास

PM Kisan: किसान सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारी

SCROLL FOR NEXT