Caste Certificate Agrowon
ॲग्रो विशेष

Caste Certificates : भटक्या विमुक्तांचे दाखले घरोघरी जाऊन द्यावेत

Distribution of Caste Certificate : दाखले वितरणासाठी घरोघरी जाऊन कार्यक्रम राबवावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे करण्यात आली.

Team Agrowon

Solapur News : वडवळ (ता. मोहोळ) येथे आज (ता. १) होणारा मतदार नोंदणी व इतर महसुली दाखले वितरण कार्यक्रमाला आमची हरकत आहे. असा उपक्रम, दाखले वितरणासाठी घरोघरी जाऊन कार्यक्रम राबवावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांकडे करण्यात आली.

मोहोळ विधानसभा मतदार संघातील भटक्या विमुक्त जाती आणि जमातींमधील वंचित लाभार्थ्यांना विविध प्रकारचे महसुली दाखले आणि मतदार नोंदणीसाठी कार्यक्रम वडवळ येथे होणार आहे. वडवळ येथे भटके आणि वंचितांची लोक वस्ती नाही. मोहोळ, पेनूर, टाकळी सिकंदर, पाटकूल, यावली, कामती, लमाण तांडा, नरखेड, मसले चौधरी आदी गावात या समाजाची संख्या आहे.

या गावातील लोकांना वडवळ येथे येणे-जाणे गैरसोयीचे आहे. प्रवास आणि आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. तसेच हा समाज पालावर राहणारा असून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे. या समाजातील प्रत्येक घटकाला दररोज रोजी-रोटीसाठी गाव सोडून जावे लागते.

या उपक्रमासाठी आल्यानंतर आमचे आर्थिक नुकसान व उपासमार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा कार्यक्रम या गावात न करता समाजाच्या पालावर, तांड्यावर जाऊन राबवावा,’’ अशी मागणी भाजपचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खिलारे, अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले व महेश सोवनी यांनी केली.

वडवळ हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तसेच लांबोटी, सावळेश्वर, लमाणतांडा या परिसरातील नागरिकांना येणे सोयीचे आहे. मोहोळमध्ये हे लोक आले तर आम्ही तलाठी व सर्कल यांच्या माध्यमातून त्यांना उपक्रम स्थळी पोहोच करण्याची व्यवस्था करू.
सचिन मुळीक, तहसीलदार, मोहोळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT