Onion export Ban Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी

Onion Market Update : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी, शेतकऱ्यांचे पीककर्ज सरसकट माफ करावे.

Team Agrowon

Nashik News : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी, शेतकऱ्यांचे पीककर्ज सरसकट माफ करावे. पीक विमा कंपन्यांना संपूर्ण पीक नुकसान भरपाई देण्यास बंधनकारक करावे आदी मागण्यांसाठी काँग्रेसने जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करत निवेदन देण्यात आले.

शासनाने निर्यातबंदीचा निर्णय मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकऱ्यांचे पीककर्ज सरसकट माफ करावे. पीक विमा कंपन्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश द्यावेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार ही केंद्र शासनाची घोषणा हवेतच विरली आहे.

मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त असल्याने तशा उपाययोजना तातडीने कराव्यात. आदिवासी बांधवांसाठी खावटी कर्ज देण्यात यावे. महागाई नियंत्रणात आणावी. वीज दुरुस्ती विधेयक व स्मार्ट मीटर प्रकल्प रद्द करावा.शेतकऱ्यांचे थ्री फेज वीजपंपाचे बिल माफ करावे. मालेगाव पॉवर सप्लाय लिमिटेड कंपनीने आकारलेले अतिरिक्त दर कमी करावे या मागण्या करण्यात आल्या आहेत.

यावेळी डॉ. राजेंद्र ठाकरे, आदिवासी जिल्हाध्यक्ष मंगला तलवारे, तालुकाउपाध्यक्ष दत्तात्रय खैरनार, वाय. के. खैरनार, श्रीकृष्ण सोनवणे, संजय पवार, डॉ.अरुण पठाडे, एकनाथ कन्नोर, रामभाऊ हाके, डॉ. महिंद्र शिरोळे, काळू सावंत, गोरख पाटील, गणेश देवरे, महादू बच्छाव, गुलाबराव सोनवणे, सरला दळवी, आशाबाई सोनवणे, सरला गायकवाड सहभागी झाले होते.

कांद्यासह इतर शेतीपिकांना भाव नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात आहेत. चांगला भाव मिळत असताना निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादकांच्या तोंडातील घास हिरावून घेण्यात आला. शासनाने तत्काळ निर्यातबंदी मागे घ्यावी. दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे.
- डॉ. तुषार शेवाळे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT