Onion Export Ban : पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी तापला कांदा निर्यातबंदी मुद्दा

Narendra Modi On Nashik Tour : केंद्र सरकारने कांदाप्रश्नी हस्तक्षेप केल्याने दर निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे.
Narendra Modi
Narendra ModiAgrowon
Published on
Updated on

Nashik News : केंद्र सरकारने कांदाप्रश्नी हस्तक्षेप केल्याने दर निम्म्यावर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. तरीही उद्या (ता.१२) युवा महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यापूर्वी कांदा निर्यातबंदीचा मुद्दा तापला आहे.

कांदा निर्यातबंदी मागे घेऊनच दौरा करावा, कांदा उत्पादकांसाठी काय करणार हे जाहीर करावे, अशी शेतकरी, संघटनांची मागणी आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याला कांदा उत्पादकांचा विरोध आहे. त्यामुळे या प्रश्‍नी पंतप्रधान काय बोलतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

कांदा दरात क्विंटलमागे १५०० ते १८०० रुपयांपर्यंत घसरण झाली आहे. गतवर्षी एप्रिल ते ऑगस्टअखेर उन्हाळ कांद्याचा उत्पादन खर्च वसुल होईल इतकाही दर नव्हता. त्यानंतर सप्टेंबरमध्ये कांदा दरात सुधारणा दिसून येताच केंद्र सरकारने पहिल्यांदाच कांद्यावर ४० टक्के निर्यातमूल्य लागू केले.

Narendra Modi
Onion Export Ban : ...तर मोदींच्या नाशिक दौऱ्याचा निषेध करावा

त्यामुळे बाजारपेठ अस्थिर होऊन अप्रत्यक्ष निर्यातबंदीच झाली. त्यामुळे कांदा दरवाढीला ब्रेक लागला आहे. ग्राहकहित व आगामी निवडणुका समोर ठेवून कांदा दर नियंत्रित ठेवण्याचे काम सरकारने केले आहे. त्यामुळे अडचणीत आलेले कांदा उत्पादक संतापलेले आहेत.

‘दौऱ्यात कांदे मारण्याचा इशारा’

‘‘उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर असताना १२ जानेवारीपर्यंत निर्यातबंदी माघारी घ्यावी, नाहीतर नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात कांदे मारू. आमचा राग व्यक्त करावाच लागणार आहे,’’ असे रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी सांगितले.

Narendra Modi
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदाचा फटका पोहोचला १४०० कोटींवर

‘पंतप्रधानांबरोबर भेट घडवून आणा’

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजनांसंबंधीची बाब थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घालण्यासाठी थेट बोलावे, असे शेतकऱ्यांना वाटते. त्यासाठी पंतप्रधानांशी राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणावी. चर्चेसाठी वेळ राखीव ठेवावा, या आशयाचे निवेदन गिरीश महाजन यांना संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिले आहे.

कांदा उत्पादकांवर मोठे आर्थिक संकट आले आहे. पंतप्रधान नाशिकमध्ये येत आहेत. या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट केली पाहिजे. कांदा उत्पादकांसाठी ते काय करणार हे जाहीर केले पाहिजे. ते केले नाही तर उद्रेक अटळ आहे. कांदा उत्पादक रणांगणात उतरल्याशिवाय राहणार नाहीत.
- डॉ. अजित नवले, राष्ट्रीय सहसचिव, अखिल भारतीय किसान सभा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com