Cotton Research Center  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Research Center : केंद्रिय कापूस संशोधन संस्थेत मिळणार कृषी शिक्षणाचे धडे

Indian Agricultural Research : भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेला सध्याचा अभिमत विद्यापीठाऐवजी राष्ट्रीय स्तरावर मेगा विद्यापीठाचा दर्जा देण्याचे प्रस्तावीत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेला सध्याचा अभिमत विद्यापीठाऐवजी राष्ट्रीय स्तरावर मेगा विद्यापीठाचा दर्जा देण्याचे प्रस्तावीत आहे.

त्या पार्श्‍वभूमीवर देशभरात १३ ठिकाणी शैक्षणिक हब मंजूर करण्यात आले आहेत. नागपुरातील केंद्रिय कापूस संशोधन संस्थेचाही त्यामध्ये समावेश असून, या ठिकाणी विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आणि पीएचडी अभ्यासक्रम पूर्ण करता येणार आहे.

जागतिक पातळीवर कृषी शिक्षणाचा दर्जा सुधार आणि संशोधनाला चालना मिळावी यासाठी मेगा विद्यापीठाची संकल्पना आहे. त्याच धर्तीवर देशात भारतीय कृषी संशोधन संस्थेला मेगा विद्यापीठ म्हणून मान्यता देण्याचे प्रस्तावीत आहे. सध्या आयएसआरआय हे अभिमत (डिम्ड) विद्यापीठ आहे. परिणामी त्याला मर्यादा आहेत.

‘आयएआरआय’ला स्वतंत्र मेगा विद्यापीठाचा दर्जा प्राप्त व्हावा याकरिता या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात शैक्षणिक संस्था असणे गरजेचे आहे. त्यामुळेच भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या संस्थांमध्ये शैक्षणिक हब स्थापन करण्याला मान्यता देण्यात आली आहे. देशभरात तब्बल १३ संस्थांमध्ये अशा प्रकारचे हब मंजूर करण्यात आले असून, महाराष्ट्रात नागपुरातील केंद्रिय कापूस संशोधन संस्थेचाही त्यामध्ये समावेश आहे.

‘सीआयसीआर’अंतर्गत विद्यार्थ्यांना शिकविण्याकरिता ४० प्राध्यापक व ३१ रिसर्च गाइडची उपलब्धता करून देण्यात आली आहे. या वर्षी पहिल्या टप्प्यात पदव्युत्तर तसेच पीएचडी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून, कीटकशास्त्र (एन्टॉमॉलॉजी) तसेच रोगनिदानशास्त्र (पॅथॉलॉजी) या विद्याशाखाकरिता हे प्रवेश देण्यात आले आहेत.

पुढील वर्षी कृषिशास्त्र (ॲग्रोनॉमी), मृद्‍ विज्ञान तसेच जैव तंत्रज्ञान (बायो-टेक्‍नॉलॉजी) या विद्याशाखांकरीता देखील प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे संस्थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद यांनी सांगितले. ‘आयएआरआय’ विद्यापीठाद्वारे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणार असून, पात्र विद्यार्थ्यांकरिता फेलोशिपची सुविधादेखील असल्याचे ते म्हणाले.

कृषी अभ्यासक्रमांकाकरिता ‘आयसीएआर’द्वारे केंद्रिय पद्धतीने प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्याआधारे पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंती क्रमानुसार कृषी अभ्यासक्रमाकरिता संबंधित संस्थेमध्ये प्रवेश देण्याचे धोरण आहे. त्यानुसार केंद्रिय कापूस संशोधन संस्थेमध्ये यंदाच्या वर्षात आठ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. त्यामध्ये बहुतांशी केरळ राज्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
डॉ. वाय.जी. प्रसाद, संचालक, केंद्रिय कापूस संशोधन संस्था, नागपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT