Government School Agrowon
ॲग्रो विशेष

ZP School : ‘झेडपी’च्या ३९४ प्राथमिक शाळांत लवकरच सीसीटीव्ही

CCTV In School : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटी १० लाखांचा निधी मिळाला आहे.

Team Agrowon

Solapur News : जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटी १० लाखांचा निधी मिळाला आहे. यासाठी काढलेल्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

त्यानुसार ठेकेदाराकडून ३९४ शाळांमध्ये त्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू झाले असून, लवकरच कामाला सुरवात होणार आहे. त्यामुळे त्या शाळांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. बदलापुरातील घटनेनंतर २१ ऑगस्ट रोजी राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश दिले होते.

जिल्हा वार्षिक योजनेतून पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी तीन कोटी १० लाखांचा निधी देण्यात आला आहे. त्याच्या निविदेची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. शाळा सुटीचे दिवस वगळता चार महिन्यांत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

गरज ५५ कोटींची, मिळाले तीन कोटी

जिल्हा परिषदेच्या एकूण दोन हजार ७७७ प्राथमिक शाळा आहेत. प्रत्येक शाळेत आठ सीसीटीव्ही बसविण्यासाठी अंदाजे ५५ कोटींची गरज आहे. मात्र, जिल्हा नियोजन समितीने त्यासाठी केवळ तीन कोटी १० लाखांचा निधी दिला आहे.

सीसीटीव्ही बसविण्यात येणाऱ्या शाळांची तालुकानिहाय संख्या

उत्तर सोलापूर : : २७

दक्षिण सोलापूर : : ६१

अक्कलकोट : : ४४

बार्शी : : २७

मोहोळ : : ५६

मंगळवेढा : : २४

पंढरपूर : : ३३

सांगोला : : २२

करमाळा : : २३

माढा : : २९

माळशिरस : : ४८

एकूण : : ३९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vasantdada Sugar Institute: 'व्हीएसआय'ला दिल्या जाणाऱ्या अनुदानाची चौकशी होणार

Spirulina : आरोग्यदायी स्पिरुलिना

Montha Cyclone: मोंथा चक्रीवादळाची तीव्रता वाढली; आज सायंकाळी जमिनीवर धडकणार, जोरदार पावसाचा अंदाज

Bacchu Kadu : संध्याकाळपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी निवासस्थानी जावं लागेल; बच्चू कडू यांचा इशारा

Dairy Farming Success : दूध व्यवसायातून तयार झाली ओळख

SCROLL FOR NEXT