APMC Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Apmc Election : कोल्हापूर बाजार समितीत पॅनेलबाबत नेत्यांचा सावध पवित्रा

शेती उत्पन्न बाजार समितीची येणे बाकी असल्याच्या कारणावरून बारा माजी संचालकांचे अर्ज निवडणुकीसाठी अवैध ठरले.

Team Agrowon

Kolhapur News : शेती उत्पन्न बाजार समितीची येणे बाकी असल्याच्या कारणावरून बारा माजी संचालकांचे अर्ज निवडणुकीसाठी अवैध ठरले. यापैकी तिघांनी जिल्हा सहकार निबंधकांकडे अपील दाखल केले. अन्य संचालकांनी अद्याप अपील केलेले नाही.

अवैध ठरलेल्या माजी संचालकांना निवडणूक लढवता येणे तूर्त मुश्कील झाले आहे. परिणामी, पक्षीय नेत्यांची बाजार समितीत अभ्यासू, अनुभवी उमेदवार निवडण्याप्रश्‍नी कोंडी झाल्याने नेतेही पॅनेल बनविण्याबाबत सावध पवित्रा घेत आहेत.

उमेदवारी अवैध ठरविल्याबाबत आम्ही अपील करीत आहोत, असे सांगणाऱ्यांनी अजूनही अपील केलेले नाही.

बाजार समिती निवडणुकीत येत्या २० एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहेत. पॅनेल बांधणीसाठी राजकीय नेत्यांनी झटपट निर्णय घ्यावा लागत आहे. मात्र, ज्यांना बाजार समितीच्या कारभाराचा अनुभव आहे, असे १२ माजी संचालक निवडणूक रिंगणात उतरलेले नाहीत.

बहुतांश जण बाजार समिती निवडणुकीतून प्रथमच राजकारणात येत आहेत, असे ७० टक्क्यांहून अधिक उमेदवार आहेत. तर काही अन्य उमेदवारांना विविध कार्यकारी सेवा संस्था व ग्रामपंचायतीत काम केल्याचा अनुभव आहे.

अशात पक्षीय नेत्यांनी पॅनेलसाठी प्राथमिक चर्चा सुरू केल्या असल्या तरी अंतिम निर्णय झालेला नाही.

तोपर्यंत उमेदवारी अर्ज भरलेले अनेकजण कॉंग्रेस, राष्‍ट्रवादी, शिवसेना, भाजप यांच्या जिल्हाध्यक्ष तसेच आमदारांना भेटून पॅनेलमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत. येत्या दहा दिवसांच्या आत पॅनेल झाले तरच पुढे प्रचार करता येणार आहे.

अन्यथा २० ते २६ एप्रिल या सहा दिवसांच्या कालावधीत सहा तालुक्यांतील मतदारांपर्यंत अजेंडा पोहोचवणे मुश्कील आहे. त्यामुळे काही मोजकेच उमेदवार नेत्यांकडे जाऊन पॅनेलमध्ये घेण्यासाठी मनधरणी करीत आहेत.

तूर्त शेतकरी कामगार पक्ष, जनसुराज्य, राष्‍ट्रवादी यांचे प्रत्येकी तीन ते चार उमेदवार तयार आहेत. तर काँग्रेसकडे एक पॅनेल होईल इतके पुरसे उमेदवार आहेत.

राष्‍ट्रवादी, शिवसेना व भाजप यांच्याकडे इच्छुक अनेकजण आहेत. मात्र, नेत्यांचे एकमत झालेले नाही. पॅनेल तातडीने तयार झाले तरच मतदारांपर्यंत अजेंडा पोहोचवता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Crisis: शेतकऱ्यांवर ठपका ठेवत पाच हजार कोटींची बचत

Monsoon Rain: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Donald Trump Tarrif Decision: डोनाल्ड ट्रम्पचा भारताला जोरदार झटका; सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क लावणार

PM Kisan: किसान सन्मान नव्हे, अपमान योजना; पंजाबराव पाटील

Crop Insurance: चंद्रपुरात पीकविम्याला कमी प्रतिसाद

SCROLL FOR NEXT