Soil Erosion Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Health : जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे आणि उपाय

Soil Fertility : दिवसेंदिवस पीक उत्पादनात घट होतेय. भारतात तर जगाच्या तुलनेत एकरी उत्पादकता फारच कमी आहे. त्याला कारण म्हणजे जमिनीची कमी होत जाणारी सुपीकता.

Team Agrowon

Soil Fertility Management : दिवसेंदिवस पीक उत्पादनात घट होतेय.  भारतात तर जगाच्या तुलनेत एकरी उत्पादकता फारच कमी आहे. त्याला कारण म्हणजे जमिनीची कमी होत जाणारी सुपीकता.  

विविध कारणांमुळे दिवसेंदिवस जमिनीचे आरोग्य खालावत आहे. जमीन सुपीकता कमी होण्याची कारणे काय आहेत आणि यावर उपाय काय करायचे याचीच माहिती घेऊया. 

जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे 

    जमिनीचा सामू सहापेक्षा कमी किंवा आठपेक्षा जास्त असणे.

    जमिनीत सेंद्रिय कर्बाचे कमी प्रमाण असणे.

    जमिनीत चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असणे.

    जमिनीची जलधारण क्षमता कमी असणे.

    भरखताद्वारे दिलेल्या अन्नद्रव्यांचे जमिनीत स्थिरीकरण होणे.

    जमीन पाणथळ किंवा उथळ किंवा फार खोल असणे.

    सतत एकच पीक घेत राहणे. पिकांची फेरपालट न करणे.

    भरखते अजिबात न वापरणे, खा­ऱ्या पाण्याचा सतत वापर करणे.

जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय

    पूर्वमशागत व आंतरमशागत योग्य प्रकारे करणे. 

    पिकांची फेरपालट व फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश.

    भरखतांचा (शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत, लेंडीखत) वापर हेक्टरी किमान पाच टन करावा. 

    हिरवळीच्या खतांचा वापर करणे.

    कृषी व्यवसायातील उपपदार्थ (प्रेसमड, कोंबडीखत, पाचटाचे खत) खत म्हणून वापरणे. 

    जैविक / जिवाणू खतांचा वापर.

    रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल वापर करणे.

    क्षारवट, चोपण व विम्ल जमिनी सुधारण्यासाठी भूसुधारकांचा वापर करणे.

    शेतात जल व मृदसंधारण करणे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election 2024 Update : भाजप पहिल्या स्थानावर; तर कॉँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर, पहिले कल काय सांगतात?

Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

Maharashtra Election 2024 : सत्तास्थापनेसाठी दोन्हींकडून तयारी; मतदानात ०.९४ टक्क्यांची वाढ

Orange Growers Compensation : संत्रा बागायतदारांना भरपाईसाठी ‘तारीख पे तारीख’

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

SCROLL FOR NEXT