Cattle Census App Agrowon
ॲग्रो विशेष

Cattle Census App : तांत्रिक अडचणीत अडकलेल्या पशुगणनेची अखेर तारीख ठरली

sandeep Shirguppe

Livestock Census Campaigns Maharashtra : तांत्रिक कारणास्तव रखडलेली पशुगणना २५ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोबाईलद्वारे नोंदणी करताना काही चुका होत असल्याची बाब समोर आल्याने मोहीम सुरू होण्याआधीच थांबवण्यात आली होती. सध्या पशुसंवर्धन विभागाकडून ॲपमधील त्रुटी दूर करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे २५ ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरू होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकार दर पाच वर्षांनी पशुगणना करते. याआधी २०१९ मध्ये विसावी पशुगणना झाली होती. चालू वर्षी एकविसावी पशुगणना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने मोबाईलद्वारे ऑनलाइन पद्धतीने नोंदणीचे नियोजन केले होते. पशुगणना मोहिमेत गाय, म्हैस, शेळी, मेंढी, कुक्कुट, अश्व, वराह, पाळीव कुत्री, भटकी जनावरे, यांची गणना केली जाणार आहे.

नोंदणी करताना चुका

डिजिटल पद्धतीचा वापर करून पशुगणना करण्यात येणार आहे. पशुगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या अॅपद्वारे ऑगस्ट महिन्यात प्रयोगिक तत्त्वावर काही ठिकाणी पशुगणना करण्यात आली होती. त्यादरम्यान नोंदणीत काही चुका होत असल्याची बाब समोर आल्याने पशुगणनेचे काम लांबणीवर पडली आहे.

‘टॅगिंग’ नसलेल्या जनावरांची गणना होणार का?

शासकीय योजनांचे लाभ, दूध अनुदान, उपचार किंवा अन्य लाभ देण्यासाठी पशूंची टॅगिंग प्रक्रिया राबविण्यात येत आहे. परंतु अद्यापही पशुधन टॅगिंगपासून वंचित राहिल्याची समजते आहे. गावापासून दूरवर असणाऱ्या वस्त्यांवरील शेतकऱ्यांच्या जनावरांचे टॅगिंग झालेले नाही. त्या जनावरांची पशुगणना होणार का, असा प्रश्‍न आहे.

अचूक माहिती देण्याचे आवाहन

पशुधनाची माहिती घेण्यासाठी जे कर्मचारी येतील त्यांना पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी खरी आणि अचूक माहिती द्यावी. दिलेल्या माहितीच्या आधारे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात किती पशुधन आहे, त्यानुसार लसीकरण औषधांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे चुकीची माहिती देऊ नये. सर्वांनी पशुगणनेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT