Congress on BJP : भाजप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा शत्रू; काँग्रेसकडून जोरदार टीका

Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचा रंग चढत असतानाच काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल केला आहे. तसेच शेतकरी प्रश्नावरून एक्सवर ट्विट करत टीका केली आहे.
Maharashtra Assembly Elections 2024
Maharashtra Assembly Elections 2024 Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढत आहे. राजकीय पक्ष जागावाटावरून खलबतं करत असून भाजपने रविवारीच (ता.१६) ९९ जागांसाठी उमेदवारांची लिस्ट जाहीर केली. यानंतर काँग्रेसने भाजपवर हल्लाबोल करताना जोरदार टीका केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपला निशाना साधला आहे. भाजप महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी शत्रू असल्याचे म्हटलं आहे. खरगे यांनी याबाबत एक्सवर ट्विट करत सोमवारी (ता.२१) पोस्ट केली आहे.

खरगे यांनी, राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्न उपस्थित करताना, महाराष्ट्र माँगे महापरिवर्तन असे म्हटले आहे. तसेच खरगे यांनी राज्यात २० हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याचा दावा केला आहे. तसेच त्यांनी, शेतीच्या निधीमध्ये मोठी कपात, २० हजार कोटींच्या वॉटर ग्रिडच दिलेले खोटे वचन, महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचं फसवं आश्वासन भाजपने राज्यातील जनतेला दिल्याचे म्हटलं आहे.

Maharashtra Assembly Elections 2024
Congress 7 Guarantee : काँग्रेसकडून हरियाणात हमीभाव कायदा, जातीनिहाय जनगणना सर्वेक्षणासह ७ घोषणा, भाजपवर टीकाही

याचबरोबर भाजप सरकारने राज्यातील अन्नदात्याला नुकसानभरपाई देण्यास नकार दिला असून विमा कंपन्यांना तब्बल ८ हजार कोटींचा फायदा करवून दिला. कांदा आणि सोयाबीनच्या निर्यातबंदी आणि जास्तीच्या निर्यात शुल्कामुळे शेतकऱ्यांवर भार लादल्याचे खरगे यांनी म्हटले आहे.

सध्या कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घसरण झाली असून राज्याच्या दुग्ध सहकारी संस्थांवर संकट ओढावले आहे. याची कबूली सरकारनेच दिली आहे. भाजपच्या महायुती सरकारने स्वत: ला डबल इंजिन सरकार म्हटलं आहे. पण आता याच डबल इंजिन सरकारला हटविण्याचे यामहाराष्ट्राने ठरवले आहे. हे सरकार गेले तरच शेतकऱ्यांचे भले होईल, असे देखील काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com