Kisan Rail
Kisan Rail Agrowon

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Agriculture Train : शेतकऱ्यांच्या मालाचे बुकिंग आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने देवळाली ते दानापूर शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेन वेळापत्रकानुसार चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on

Nashik News : शेतकऱ्यांच्या मालाचे बुकिंग आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने देवळाली ते दानापूर शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेन वेळापत्रकानुसार चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही ट्रेन मध्यंतरीच्या काळात काही दिवस बंद होती. आता रिसर्च अँड डेव्हलपमेंट (संशोधन व विकास) या तत्त्वावर ही ट्रेन चालू केली आहे.

शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेन सुरू झाल्यामुळे नाशिकचे द्राक्ष, आंबे, डाळिंब, पालेभाज्या, फळभाज्या, तांदूळ, गहू, कांदा, वाइन, पेरू, कोबी, मिरच्या या परराज्यात जलद पोचणार आहेत. पर्यायाने शेतकऱ्यांच्या मालाला हायटेक भाव मिळेल. त्यामुळे व्यापारी आणि शेतकरी या ट्रेनची पार्सल बुकिंगसाठी रेल्वे स्थानक परिसरात गर्दी करीत आहेत.

Kisan Rail
Organic Produce Export : सेंद्रिय माल निर्यात संधी वाढणार

या शेतकरी समृद्धी स्पेशल ट्रेनमध्ये १० सामान्य द्वितीय श्रेणी, १० पार्सल व्हॅन आणि तीन स्लीपर बोगी आहेत. यामुळे दानापूर आणि पाटण्याकडे जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी होईल.

Kisan Rail
Export of Agriculture Organic Produce : पारदर्शकतेतूनच वाढेल सेंद्रिय शेतीमाल निर्यात

त्यामुळे शेतकरी आणि मजूर दोघांनाही प्रवासाची सुविधा मिळणार आहे. नाशिक रोड, मनमाड जंक्शन, जळगाव, भुसावळ जंक्शन, बऱ्हाणपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, प्रयागराज, छिवकी, पंडित दीनदयाळ उपाध्याय जंक्शन, बक्सर आणि आराह येथे ट्रेनचे थांबे असणार आहेत.

लोडिंगसाठी प्रमुख थांबे

नाशिक ते दानापूर अंतर १,५०९ किमी

मनमाड ते दानापूर अंतर १,४३६ किमी

भुसावळ ते दानापूर अंतर १,२५२ किमी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com