Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

Crop Damage : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८२ महसूल मंडलामध्ये रविवारी (ता. २०) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यातील ८२ महसूल मंडलामध्ये रविवारी (ता. २०) सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला.परभणी जिल्ह्यातील मोरेगाव (ता.सेलू) मंडलात (९४.५ मिमी) आणि चुडावा (ता.पूर्णा) मंडलामध्ये (६६ मिमी) २ आणि हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव (७२.८ मिमी) आणि गोरेगाव (७२.८ मिमी) मंडलात मिळून दोन जिल्ह्यातील ४ मंडलात अतिवृष्टी झाली.

काढणी सुरु असलेले सोयाबीन तसेच वेचणीस आलेल्या कापूस तसेच तूर पिकांचे नुकसान झाले आहे.परंतु खोळंबलेल्या रब्बी पेरणीसाठी दिलासा मिळाला. परभणी व हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनची सुगी अंतिम टप्प्यात आहे.

Crop Damage
Nashik Crop Damage : नाशिक जिल्ह्याला पुन्हा पावसाने झोडपले

शेतामध्ये सोयाबीनच्या गंजी लावल्या आहेत. अनेक ठिकाणी मळणीयंत्राद्वारे काढणी सुरु आहे. परंतु अनेक पावसामुळे भिजल्याने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे कपाशीची बोंडे फुटली आहेत. अनेक भागात कापूस वेचणी सुरु आहे. परंतु मजूर मिळत नसल्यामुळे वेचणी राहिलेला कापूस पावसात भिजुन बोंडातून गळून पडल्याने तसेच तूर पीक वाकल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

तापमानात वाढ झाल्यामुळे जमिनीत पेरणीसाठी पुरेसा ओलावा नसल्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पेरण्या खोळंबल्या आहेत. या पावसामुळे उपलब्ध झालेल्या ओलाव्यावर पेरणी करता येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडलात पावसाचा जोर होता. मोरेगाव (ता. सेलू) मंडलात (९४.५ मिमी), चुडावा (ता. पूर्णा) मंडलात (६६ मिमी) अतिवृष्टी झाली.

Crop Damage
Crop Damage : शेतकऱ्यांसाठी रात्र ठरली वैऱ्याची

जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये सरासरी २६.३ मिलिमीटर तर ऑक्टोंबर मध्ये सरासरी ३६.६ मिलिमीटर पाऊस झाला. यंदा १ जून पासून आजवर एकूण सरासरी ८६४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलात हलका ते जोरदार पाऊस झाला.

सेनगाव (७२.८ मिमी) आणि गोरेगाव (७२.८ मिमी) मंडलात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी ३८.९ मिलिमीटर तर ऑक्टोंबर मध्ये ४६.९ मिलिमीटर पाऊस झाला. यंदा १ जून पासून आजवर सरासरी ९३८ मिलिमीटर पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (मिलीमीटरमध्ये)

परभणी जिल्हा ः परभणी शहर २३.८, परभणी ग्रामीण २४.५, पेडगाव ३६.८, जांब ३४, झरी ३०, सिंगणापूर २६.३, दैठणा १०.८, पिंगळी १८.३, टाकळी कुंभकर्ण २५.८, जिंतूर २४, सावंगी म्हाळसा २८.३, बामणी २४, बोरी ३२, आडगाव ३१, चारठाणा ४१.३, वाघी धानोरा ४१.३, दूधगाव ३८.३, सेलू ५४.३, देऊळगाव गात १५, वालूर ४१.८, कुपटा १६, चिकलठाणा ५७.५, मोरेगाव ९४.५,

मानवत १९.८, केकरजवळा १८.५, कोल्हा २४.३, ताडबोरगाव २७.८, रामपुरी १०.८, पाथरी २०.३, बाभळगाव १८.८, हादगाव ११.५, सोनपेठ ३०, गंगाखेड १५, महातपुरी ११.५, माखणी १८.८, राणीसावरगाव १०, पालम २०.८, चाटोरी १६.८, बनवस १७, पेठशिवणी ३१.५, रावराजूर २४, पूर्णा ३३.५, ताडकळस १६, लिमला १२, कात्नेश्वर ३७.५, चुडावा ६६, कावलगाव ५३.८.

हिंगोली जिल्हा ः हिंगोली २८.८, नरसी नामदेव ३१.८, सिरसम ६३.८, बासंबा ६१.८, दिग्रस कऱ्हाळे १६.५, माळहिवरा ४२.३, खंबाळा ४४.८, कळमनुरी ३२.३, वाकोडी ४८.५, नांदापूर १४, आखाडाबाळापूर १४, डोंगरकडा ४८.३, वांरगा १९.८, वसमत ३३, आंबा ४१.८, हयातनगर ३३, गिरगाव ४९.५, हट्टा २२.५, टेंभुर्णी २७.५, कुरुंदा ३५, औंढा नागनाथ ४६.५, येळेगाव ३०.३, साळणा ३९.३, जवळा बाजार ४०.८, सेनगाव ७२.८, गोरगाव ७२.८, आजेगाव ३३.५, साखरा ४०.३, पानकन्हेरगाव ४२.५, हत्ता ४०.५.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com