Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

MSP Procurement : केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत यंदा परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) यांच्या तर्फे सोयाबीन, मूग, उडदाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे.
Soybean Procurement Process
Soybean Procurement ProcessAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : किमान आधारभूत किंमत दराने (प्रतिक्विंटल ४८९२ रुपये) यंदाच्या (२०२४-२५) खरीप हंगामातील सोयाबीनच्या विक्रीसाठी शुक्रवार (ता. १८) पर्यंत परभणी जिल्ह्यात २ हजार ९३० आणि हिंगोली जिल्ह्यात १ हजार ६५७ मिळून एकूण ४ हजार ५८७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

या दोन जिल्ह्यात मंगळवार (ता. १५) पासून १८ सोयाबीन खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. परंतु सोयाबीनमध्ये ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. निकषाबाहेरचे सोयाबीन येत असल्यामुळे खरेदीसाठी अडचणी येत असल्याचे पणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.

Soybean Procurement Process
Soybean Harvesting : सोयाबीन कापणीला एकरी सहा हजारांचा खर्च

केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत यंदा परभणी जिल्ह्यात राज्य सहकरी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ (नाफेड) यांच्या तर्फे सोयाबीन, मूग, उडदाची हमीभावाने खरेदी केली जाणार आहे. जिल्ह्यात परभणी, पेडगाव, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, पूर्णा या ९ ठिकाणी खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

शुक्रवार (ता. १८) पर्यंत यान केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी २ हजार ९३० शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी परभणी केंद्रावर १५० शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. मंगळवार (ता. १५) पासून परभणी येथील केंद्रावर सोयाबीनची खरेदी सुरु करण्यात आली परंतु लॉट इंट्री झाली नसल्यामुळे खरेदीची बाबतची आकडेवारी उपलब्ध झाली नाही.

Soybean Procurement Process
Soybean Market : सोयाबीनमध्ये सबुरीची गरज

इतर केंद्रावर खरेदी झाली. हिंगोली जिल्ह्यात राज्य सहकारी पणन महासंघ व केंद्रीय नोडल एजन्सी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांच्यातर्फे हमीभावाने सोयाबीन, मूग, उडीद खरेदी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात बळसोंड हिंगोली, कन्हेरगाव, कळमनुरी, वारंगा, वसमत, जवळा बाजार, येळेगाव, सेनगाव, साखरा ही ९ खरेदी केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत.

Soybean Procurement Process
Cotton Soybean Scheme : कापूस, सोयाबीन योजनेसाठी पुन्हा ५०० कोटींचा निधी

शुक्रवार (ता. १९) पर्यंत या केंद्रांवर सोयाबीन विक्रीसाठी १ हजार ६५७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी कळमनुरी, वारंगा, साखरा या केंद्रावर सोयाबीन विक्रीसाठी आणण्यासाठी २४ शेतकऱ्यांना एसएमएस पाठविण्यात आले. परंतु सोयाबीनची खरेदी मात्र झाली नाही, असे पणन महासंघाच्या सूत्रांनी सांगितले.

परभणी-हिंगोली जिल्हे हमीभाव

सोयाबीन विक्री शेतकरी

नोंदणी स्थिती

केंद्र ठिकाण शेतकरी नोंदणी

एसएमएस

परभणी २३७ १५०

पेडगाव ३० ००

जिंतूर १६७ ००

बोरी २४९ ००

सेलू ७०३ ००

मानवत ४५६ ००

पाथरी २६० ००

सोनपेठ ४०८ ००

पूर्णा ४२० ००

हिंगोली १८ ००

कन्हेरगाव २७८ ००

कळमनुरी १२५ १०

वारंगा ३०९ १०

वसमत २०८ ००

जवळा बाजार ४६६ ००

येळेगाव १२१ ००

सेनगाव ४९ ००

साखरा ८३ ००

मूग,उडदाची नोंदणी शून्य

केंद्र शासनाने यंदा मूग प्रतिक्विंटल ८६८२ रुपये, उडीद प्रतिक्विंटल ७४०० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मूग, उडदाची हमीभावाने विक्रीसाठी मंगळवार (ता. १) पासून शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. परंतु या दोन जिल्ह्यात मूग, उडीद विक्रीसाठी शेतकरी नोंदणी शून्य आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com