Vaccination Of Animals Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Department Of Animal Husbandry : पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या विविध आजारांच्या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे.

Team Agrowon

Pune News : पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या विविध आजारांच्या पार्श्‍वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यांच्या लसीकरणासाठी विविध प्रकारच्या लसींचा मुबलक पुरवठा जिल्हा आणि तालुका पातळीवर करण्यात आला आहे.

पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांचे तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले आहे. या बाबत आयुक्त दिवेगावकर म्हणाले, ‘‘जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण हा आरोग्य व्यवस्थापनाचा महत्त्वाचा भाग आहे. पावसाळी वातावरणात जनावरांना विविध आजार होतात. यामुळे पशूपालकांना उपचारांसाठी खर्च करावा लागतो.

जनावरांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आहे. या माध्यमातून विविध साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव आणि प्रसार रोखण्याची खबरदारी घेतली जात आहे. लाळ्या खुरकूत, पीपीआर, फऱ्या, घटसर्प, आंत्रविषार तसेच लम्पी स्किन आजाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

गाई, म्हशीमधील लाळ्या खुरकूत आजाराच्या नियंत्रणासाठी ४ टप्प्यांसाठी २ कोटी १ लाख ९३ हजार लस मात्रा, लम्पी स्किन आजाराच्या प्रतिबंधासाठी १ कोटी ११ लाख ९३ हजार लस मात्रा तसेच घटसर्प व फऱ्या आजाराच्या नियंत्रणासाठी १ कोटी १० लाख ९७ हजार लस मात्रा जिल्हा आणि तालुका पातळीवर पुरवठा करण्यात आल्या आहेत.

शेळ्या, मेंढ्यामधील पीपीआर आजाराच्या नियंत्रणासाठी राज्यात १ कोटी ३२ लाख ९३ हजार लस मात्रा तसेच आंत्रविषार नियंत्रणासाठी ४८ लाख ६७ हजार लस मात्रांचा पुरवठा करण्यात आला आहे. तसेच राज्यातील संपूर्ण जनावरांना पुरेल इतक्या जंतुनाशकांचा पुरवठा करण्यात आला आहे.

लसीकरणाबाबत काही शंका, तक्रारी असतील तर त्या पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या १९६२ या टोल फ्री क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. तसेच संबंधित जिल्हातील आपत्ती व्यवस्थापन कक्षासोबत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Warehouse Receipt: पूर्व युरोप, मध्य आशिया खंडातील गोदाम पावती वित्तपुरवठा

Agriculture Development: दिशा कोरडवाहू शेती विकासाची!

Fake Agri Inputs: निविष्ठांवर सरकारचे नियंत्रण किती?

Whatsapp Chatbot: महसूल विभागाच्या सेवांसाठी देणार ‘व्हॉट्सॲप चॅटबॉट’

Eknath Shinde: कमी पटसंख्येच्या शाळा बंद करणार नाही

SCROLL FOR NEXT