Akola News : जनावरांमधील लाळ्या खुरकूत हा रोग विषाणुजन्य आजार आहे. त्याच्या प्रतिबंधासाठी पशुसंवर्धन विभागाला दोन लाख ४० हजार ६०० लसमात्रा प्राप्त झाल्या आहेत. जिल्ह्यातील ७५ पशुवैद्यकीय संस्थांना या लसी वितरित करण्यात आल्या आहेत. सर्व पशुपालकांनी पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतारे यांनी केले आहे.
अकोला जिल्ह्यात २ लाख ८३ हजार ६८ गाय व म्हैसवर्गीय जनावरे, तसेच १ लाख ६० हजार ६९७ शेळ्या, मेंढ्या आहेत. जिल्ह्यात लाळ्या खुरकूत प्रतिबंध लसीकरण मोहीम सुरू आहे. लसीकरणापासून एकही पशुधन वंचित राहणार नाही याची सर्व संस्थाप्रमुखांना दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या आजारात पशुधनास १०५ ते १०६ डिग्री या प्रमाणात ताप येतो. या आजाराने दुधाळ जनावरांच्या दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. जनावरांच्या खुरामध्ये, तसेच तोंडामध्ये जखमा होतात व त्यांचे खाणे पिणे बंद होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी होते. गाभण गाय/म्हैस यांचा गर्भपात होऊ शकतो. या रोगाची लागण एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होते. या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.
या रोगाची लागणसुद्धा एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होते. यावरही प्रतिबंधक लसीकरण हा प्रभावी उपाय आहे, असेही ते म्हणाले.जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी पशुधनास या रोगाची लागण होऊ नये यासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन डॉ. बुकतारे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेंद्र अरबट आणि साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. अशोक गवळी यांनी केले आहे.
लसीकरण हाच प्रभावी उपाय
शेळ्या, मेंढ्यांमधील पीपीआर हा रोग देखील विषाणूजन्य असून या आजारात १०५ ते १०६ डिग्री या प्रमाणात ताप येतो. नाकातून व डोळ्यांतून सारखे पाणी वाहते. तोंडामध्ये जखमा होतात, श्वास घेण्यास त्रास होतो. जनावरांना हगवण लागून यामुळे मृत्यू होतो. या रोगाची लागणसुद्धा एका जनावरापासून दुसऱ्या जनावरास होते. यावरही प्रतिबंधक लसीकरण हा प्रभावी उपाय आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.