Cashew Orchard Fire Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Orchard Fire : वेत्ये येथे काजू बागेला आग

आग लागून गेल्या महिना-दीड महिन्यात आंबा, काजूची १० हजारांपेक्षा अधिक झाडे जळाली आहेत.

Team Agrowon

Sindhudurg Fire : जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून आगीचे (Fire In Cashew Orchard) सत्र सुरूच असून गुरुवारी (ता. २३) वेत्ये (ता. सावंतवाडी) येथे काजू बागेला (Cashew Orchard) आग लागली.

या आगीत बागायतदारांचे सुमारे पाच लाखांचे नुकसान (Cashew Crop Damage) झाले आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या सहाय्याने आग विझविण्यात आली.

जिल्ह्यात आग लागून गेल्या महिना-दीड महिन्यात आंबा, काजूची १० हजारांपेक्षा अधिक झाडे जळाली आहेत. उत्पादनक्षम झाडे जळत असल्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे तर काही ठिकाणी आग लावण्यामुळे हे नुकसान झाले आहे. परंतु आग लागण्याचे सत्र थांबण्याची चिन्हे नाहीत.

गुरुवारी दुपारीदेखील सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये येथे आग लागली. या आगीत काजू बागायतदार जितेंद्र गावकर, रमेश गावकर, गणपत कदम यांची शेकडो झाडे जळाली.

उत्पादनक्षम झाडे जळाल्याने शेतकऱ्यांचे चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आग विझविण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशमन बंब बोलविण्यात आला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Titling Act: महाराष्ट्रात 'लँड टायटलिंग ॲक्ट'ची तयारी अंतिम टप्प्यात; समिती गठित, जमिनींचे मालकी हक्क होणार सुरक्षित

Seed Germination: निकृष्ट बियाण्यामुळे विदर्भात सोयाबीन पेरणी रखडली

Seed Germination: नांदेड जिल्ह्यात बियाण्यांच्या उगवणक्षमतेबाबत १७४ तक्रारी

Agri Service Centre: तेरा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Rainfall Deficit: परभणीत ६७.२ मिमी, तर हिंगोली जिल्ह्यात ५०.५ मिमी कमी पाऊस

SCROLL FOR NEXT