Cashew  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

Vidarbha Konkan Gramin Bank : विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत काजू क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत काजू उत्पादकांना सहभागी होता येणार आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : काजू फळपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड असलेल्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत प्रकिया उद्योगवृद्धी व्हावी, या हेतूने विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत काजू क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत ३१ डिसेंबरपर्यंत काजू उत्पादकांना सहभागी होता येणार आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत एक लाख ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर काजू लागवड आहे. परंतु त्या तुलनेत कोकणात प्रकिया उद्योग नाहीत. काजू बी वर प्रकिया उद्योग सुरू व्हावेत याकरिता विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने काजू क्लस्टर योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत काजू प्रक्रियेवर भर दिला जाणार आहे.

काजू बी भाजणे, वाळवणे, कापणे, सोलणे, ग्रेडिंग, पॅकिंग, वाहतूक अशा सर्व गोष्टीकरिता बँक अर्थसाह्य करणार आहे. याशिवाय काजू मूल्यवर्धन उत्पादने खारवलेले काजू, मसालेदार काजू, तळलेले रंगीत काजू, यासाठी देखील अर्थसाह्य केले जाणार आहे.

काजूगर विक्री, काजू कलम रोपांची रोपवाटिका आदींवर देखील भर दिला जाणार आहे. या योजनेसाठी काजू उत्पादकांना ३१ डिसेंबरपर्यंत आहे. या योजनेसाठी प्रस्तावाकरिता बँकेने प्रकिया शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. नियमित व्याजदराने परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अर्धा टक्के व्याज परतावा सुद्धा बँकेकडून दिला जाणार आहे.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी काजू क्लस्टर तर कोल्हापूर जिल्ह्याकरिता दुग्ध व्यवसाय क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे. दोन्ही योजनांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती, पंतप्रधान रोजगार निर्मिती, पंतप्रधान सूक्ष्म फळप्रक्रिया यापैकी पात्र योजनेचा लाभ जोडला जाऊ शकतो. शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क साधावा.
बाबूराव सामंत, क्षेत्रीय व्यवस्थापक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT