Cashew Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Seed Rate : काजू बीचा दर १२० रुपयांवर स्थिरावला

Cashew Market : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० ते ३५ टक्केच काजूच्या झाडांना मोहोर आल्यामुळे यावर्षी काजूच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३० ते ३५ टक्केच काजूच्या झाडांना मोहोर आल्यामुळे यावर्षी काजूच्या उत्पादनात प्रचंड घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काजू उत्पादन ३० टक्केच येण्याचा अंदाज असला तरी काजू बीचे दर मात्र १२० रुपयांवरच स्थिरावला आहे. त्यामुळे काजू उत्पादक अडचणीत आले आहेत.

बदलत्या वातावरणाचा यावर्षी काजू हंगामावर मोठा परिणाम झाला आहे. काजूला यावर्षी पहिल्यांदाच तीन टप्प्यात मोहर आला. मात्र तरीही ३० ते ३५ टक्केच मोहर आला. हा आलेला मोहरदेखील विविध कीड-रोगांचा बळी ठरला. आंब्याप्रमाणे काजूवर देखील फूलकीडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला.

त्यामुळे काजूच्या उत्पादनात घट होणार हे निश्चित झाले आहे. ज्या शेतकऱ्यांनी काजू व्यवस्थापन काटेकोर केले त्यांनाच ३० टक्के उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. परंतु काहींना १० टक्केदेखील उत्पादन मिळण्याची शक्यता नाही. जिल्ह्यातील काजू पिकाचे उत्पादन घेणारी लाखभर कुटुंबे काजू पीक संकटात सापडल्याने अडचणीत येण्याची शक्यता आहे.

एकीकडे उत्पादन कमी असताना दुसरीकडे काजू बीचा दरदेखील १२० रुपयांवरच स्थिरावला आहे. काजूची प्रमुख बाजारपेठ असलेल्या बांदा बाजारपेठेत काजू हंगामाच्या सुरुवातीला १२६ रुपये प्रतिकिलोला दर देण्यात आला. परंतु त्यामध्ये घसरण झाली. सध्या काजू बीची आवक अत्यल्प आहे.

आठवडे बाजारात काजू बी नाहीच

जानेवारीच्या अखेरीपासून आठवडे बाजारात काजू बी खरेदी-विक्री सुरू होते. परंतु यावर्षी फेब्रुवारी संपत आला तरी अनेक आठवडे बाजारांत काजू बी आलेली नाही. यावरूनच काजू बी उत्पादन आलेख समजून येत आहे.

काजूला दोन टप्प्यांत मोहर यायचा परंतु प्रथम यावर्षी काजूला तीन टप्प्यांत मोहोर आला आहे. त्याचा मोठा परिणाम काजू उत्पादनावर होणार आहे. बदलत्या वातावरणाचा हा परिणाम आहे.
डॉ. विजय देसाई, शास्त्रज्ञ, फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT