Cashew Rate : काजू बी हमीभावासाठी सिंधुदुर्गात धरणे आंदोलन

Kaju Grower Protest : काजू बी हमीभावासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांनी शुक्रवारी (ता.१६) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.
Cashew Farmer
Cashew FarmerAgrowon

Sindhudurg News : काजू बी हमीभावासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादकांनी शुक्रवारी (ता.१६) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी काजू बीला प्रतिकिलो २०० हमीभाव मिळालाच पाहिजे, स्वामिनाथन आयोगाचा अहवाल स्वीकारलाच पाहिजे, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

जिल्ह्यातील काजू उत्पादकांनी शुक्रवारी (ता.१६) फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलने केली. प्रत्येक तालुक्यातील काजू उत्पादकांनी तहसील कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजल्यापासून आंदोलन सुरू केले.

Cashew Farmer
Cashew Rate : काजू बी दर वाढीसाठी तीन जिल्ह्यांत आंदोलन करण्याचा निर्णय

या वेळी काजू उत्पादकांनी काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव मिळावा, डॉ. एम. एस. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी अमलात आणाव्यात, गोवा शासनाप्रमाणे काजू बीच्या दराबाबत बजेटमध्ये तरतूद करावी, जीआय मानांकन काजूमधील भेसळ थांबवावी, आयात शुल्क २० टक्के करावे, यांसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केले.

Cashew Farmer
Cashew Farmers : सोयाबीन, कांदा, कापसानंतर काजूला हमी भावापेक्षाही कमी दर, तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा एल्गार

सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यांतील आंदोलनात मोठ्या संख्येने काजू उत्पादक सहभागी झाले होते. याशिवाय अन्य काही तालुक्यांमध्ये देखील आंदोलन झाले. दरम्यान, सावंतवाडी संस्थानचे लखमराजे भोसले यांनी आंदोलकांशी चर्चा करीत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.

दोडामार्ग तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, काजू बी हमीभावाकरीता सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यातील तीन अशा सतरा तालुक्यांत आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु काही तालुक्यांमध्ये आंदोलन झालेले नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com