Training of Directors of Farmer Producer Companies Agrowon
ॲग्रो विशेष

FPC Training : ‘मॅग्नेट’तर्फे १४३ एफपीसी संचालकांचे क्षमताबांधणी प्रशिक्षण

Training of Directors of FPC : महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्टतर्फे (मॅग्नेट) सह्याद्री फार्म्स, मोहाडी (जि. नाशिक) येथे नुकतेच राज्यभरातील २२ जिल्ह्यांतील १४३ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना क्षमता बांधणी प्रशिक्षण देण्यात आले.

Team Agrowon

Nashik News : महाराष्ट्र अॅग्री बिझनेस नेटवर्क प्रोजेक्टतर्फे (मॅग्नेट) सह्याद्री फार्म्स, मोहाडी (जि. नाशिक) येथे नुकतेच राज्यभरातील २२ जिल्ह्यांतील १४३ शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या संचालकांना क्षमता बांधणी प्रशिक्षण देण्यात आले.

सह्याद्री फार्म्स येथे ४ ते २२ जुलै या कालावधीत झालेल्या क्षमता बांधणी प्रशिक्षणात राज्यभरातील नाशिक, संभाजीनगर, रत्नागिरी, लातूर, अमरावती, कोल्हापूर, पुणे, नागपूर या आठ विभागांतून २२ जिल्ह्यांचा समावेश होता. त्यात रायगड, नाशिक, सांगली, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नागपूर, जालना, संभाजीनगर, उस्मानाबाद, हिंगोली, अमरावती, धुळे, रत्नागिरी, सातारा, लातूर, बीड, बुलडाणा, जळगाव, धाराशिव, चंद्रपूर आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी सहभाग घेतला.

सह्याद्री फार्म्स या प्रकल्पामध्ये सेंटर ऑफ एक्सेलेंस म्हणून कार्यरत आहे. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बळकटीकरणासाठी संचालकांना संस्थात्मक बांधणी सोबतच आवश्यक सॉफ्ट-स्किल, मॅनेजमेंट स्किल, बँकिंग सारख्या विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले. राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाद्वारे आशियाई विकास बँक (एडीबी) अर्थसहाय्यीत महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्प, मॅग्नेट संस्थेमार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

या प्रकल्पाद्वारे राज्यातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जात आहे. केळी, डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), फुले, आंबा, लिंबू, काजू आणि पडवळ या निवडक पिकांवर प्रकल्प केंद्रित आहे. संस्थात्मक क्षमता बांधणी प्रशिक्षणाच्या ४ बॅचेस पूर्ण झाल्या आहेत. त्यात १४३ शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी यात सहभाग घेतला. ४४ महिला संचालकांनी या प्रशिक्षणात सक्रिय सहभाग घेतला.

येणाऱ्या काही दिवसात आणखी बॅचेस आयोजित करण्याची योजना आखलेली असून यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, भागधारक आणि मूल्यसाखळी गुंतवणूकदार सहभागी होणार आहेत. प्रशिक्षणामुळे संचालकांमध्ये नेतृत्वगुण आणि व्यवस्थापन कौशल्ये विकसित होत आहेत. मॅग्नेट प्रकल्पाचे संस्थात्मक क्षमता बांधणी प्रशिक्षण महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्राला मजबुती देण्यासाठी आणि त्याला अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कृषी व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करण्यास मदत होते आहे. ज्यामुळे राज्यातील फलोत्पादनात वाढ होईल.

मॅग्नेट प्रशिक्षणातून आवश्यक कौशल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन मिळाला. आमचे ज्ञान अद्ययावत झाले असून आम्ही आता अधिक आत्मविश्वासाने कृषी व्यवसाय करू शकतो. आम्हाला अडचणींवर मात करण्यासाठी नवीन प्रयोग करण्याची क्षमता आणि धाडस मिळाले आहे.
नीलेश चौगुले, संचालक, शाहू महाराज शेतकरी उत्पादक कंपनी, कोल्हापूर
मॅग्नेट प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालकांनी प्रशिक्षणाचा लाभ त्यांच्या सभासदांना द्यावा. तसेच कृषी व्यवसायाशी जुळलेल्या शेतकऱ्यांच्या कृषी उत्पादनात वाढ करून, प्रक्रिया व निर्यात या कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान द्यावे. राष्ट्राच्या आर्थिक सक्षमीकरणसाठी प्रयत्न करावेत.
एस. वाय. पुरी, विभागीय प्रकल्प उपसंचालक, प्रकल्प अंमलबजावणी कक्ष, मॅग्नेट, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Legislative Assembly: कृषिमंत्री कोकाटे यांची पावसाळी अधिवेशनाकडे पाठ

Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

Guru Pournima 2025: गुरुपौर्णिमेला गुरुकुंजात गुरुदेवभक्तांची मांदियाळी

Pomegranate Price: डाळिंबाच्या एका क्रेटला साडेसहा हजार रुपये दर

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील गैरप्रकार बिहारमध्ये चालू देणार नाही

SCROLL FOR NEXT