Land Acquisition Agrowon
ॲग्रो विशेष

Forest Department : वनविभागाला दिलेली जमीन रद्द करा, अन्यथा उपोषणाचा इशारा

Land Acquisition : बेंबळा प्रकल्पातील सिंचनासाठी दिलेली जमीन शेतकरी तसेच ग्रामपंचायतीला विश्‍वासात न घेता सुपीक जमीन वनविभागाला देण्यात आली आहे.

Team Agrowon

Yavatmal News : बेंबळा प्रकल्पातील सिंचनासाठी दिलेली जमीन शेतकरी तसेच ग्रामपंचायतीला विश्‍वासात न घेता सुपीक जमीन वनविभागाला देण्यात आली आहे. या विरोधात दाभा, पहूर येथील ग्रामस्थांनी बेंबळा कार्यालयात धडक देत जमीन रद्द करण्याची मागणी केली आहे.

बेंबळा प्रकल्पातील सुपीक तसेच लागवडीखाली असलेली शेतजमीन परस्पर वनविभागाला देण्यात आली आहे. यामुळे उर्वरित शेतजमीन व लगत असलेल्या शिक्षणसंस्था, पहूर पुनर्वसन यांचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही.

चुकीच्या सर्वेमुळे जास्तीची जमीन संपादित करण्यात आल्याचा आरोप नागरिकांचा आहे. याशिवाय, शेतजमीन सिंचन प्रकल्पाला दिली असता ती वनविभागाला कशी देण्यात आली, यावरही नागरिकांनी आक्षेप घेतला.

शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला देऊन बोळवण केल्याचा आरोप आहे. उर्वरित जमिनीवर गावाचे पुनर्वसन करून वन्यप्राण्यांचा त्रास होण्याची शक्यता वर्तविली आहे. वनविभागाला दिलेली जमिन रद्द करावी, अन्यथा उपोषणाचा इशारा दाभा व पहूर येथील ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: शक्तिपीठ महामार्गाविरोधात विट्यात महिलांचा मोर्चा

Agri Power Supply Issue: शेतीसाठी सलग सहा तास वीज द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Cattle Conservation: गोवंश संवर्धनाचा भार शेतकरी-गोपालकांवर पडू नये; खासदार मेधा कुलकर्णी यांची अपेक्षा

Fake Recruitment Case: बोगस भरती प्रकरणी आत्मा प्रकल्प संचालकाला अटक

Pune APMC National Status: पुणे बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा द्या; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

SCROLL FOR NEXT